नवरा-नवरी गळ्यात हार घालणार तितक्यात स्क्रीनवर लागला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:59 IST2023-04-03T17:58:05+5:302023-04-03T17:59:31+5:30

वऱ्हाड लग्नसोहळ्याच्या हॉलमध्ये पोहोचलं आहे, नवरा-नवरी एकत्र उभे राहिले आहेत.

The video started just as the husband and wife were about to tie the necklace | नवरा-नवरी गळ्यात हार घालणार तितक्यात स्क्रीनवर लागला व्हिडिओ

नवरा-नवरी गळ्यात हार घालणार तितक्यात स्क्रीनवर लागला व्हिडिओ

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर जाहिरातींच्या टीव्ही स्क्रीनवर अचानक पॉर्न फिल्म लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, संबंधित जाहिरात एजन्सीवर कारवाईही करण्यात आली. आता, एका नवजोडप्याचा कीस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे नवरा-नवरीच्या लग्नमंडपातच त्यांचा हा व्हिडिओ दिसल्याने वऱ्हाडी मंडळींनाही आश्चर्य वाटायला लागले. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे.

वऱ्हाड लग्नसोहळ्याच्या हॉलमध्ये पोहोचलं आहे, नवरा-नवरी एकत्र उभे राहिले आहेत. गळ्यात हार घालण्याचे सर्व विधी पूर्ण झाले आहेत, दोघेही अतिशय आनंदात आहेत. तर, सर्वांच्या नजरा नवरा-नवरीकडे लागल्या आहेत. तितक्यात कुणीतीर बँकेट हॉलमध्ये नवरा-नवरीचा एक व्हिडिओ सुरू केला. प्री वेडींग शूटचा हा व्हिडिओ आहे. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हात घातला असून काही सेकंदातच ते किस करायला सुरुवात करतात. 

हॉलमधील नवरा-नवरीसाठीही हा आश्चर्याचा धक्का होता, त्यामुळेच दोघेही स्टेजवरच खजील झाले. विशेष म्हणजे नवरा-नवरीचा हा व्हिडिओ वऱ्हाडी मंडळींनीही आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. त्यामुळे, या व्हिडिओची चांगलीच मजा घेतल्याचं दिसून येतेय. सध्या सोशल मीडियावरही, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: The video started just as the husband and wife were about to tie the necklace