Video - सोन्याचा वर्षाव! लग्नात उडवली चक्क सोन्याची नाणी, जमवण्यासाठी पाहुण्याची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:50 IST2024-02-19T12:44:21+5:302024-02-19T12:50:47+5:30

एका व्यक्तीने लग्नात चक्क सोन्याची नाणी उडवल्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

the man blew gold coins at the wedding video goes viral | Video - सोन्याचा वर्षाव! लग्नात उडवली चक्क सोन्याची नाणी, जमवण्यासाठी पाहुण्याची झुंबड

Video - सोन्याचा वर्षाव! लग्नात उडवली चक्क सोन्याची नाणी, जमवण्यासाठी पाहुण्याची झुंबड

लग्न समारंभात खूप मौज-मजा केली जाते. अनेकदा लग्नात तुम्हाला घरातील काही मंडळी पैसे उडवताना दिसले असतील. पण लग्नात कधी तुम्ही सोनं उडवताना किंवा लुटताना पाहिलं आहे का?, अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने लग्नात चक्क सोन्याची नाणी उडवल्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ पाहून या लग्नात सोन्याचा पाऊस पडल्यासारखं वाटतं.

मुहम्मद अहमद नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष लग्नाच्या वेळी सोन्याचा वर्षाव करताना दिसत आहे. त्यांच्यामध्ये एक मुलगी उभी आहे, जी वधू आहे. नववधूच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या या लोकांकडे पाहून जणू काही सोनं लुटण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

एका बाजूने एक महिला सोनं असलेलं कार्ड उडवताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूने काळ्या रंगाचा सूट घातलेला पुरुष तिला सोनं उडवण्यात टक्कर देत आहे. तर काही लोक ही सोन्याची नाणी गोळा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ जवळपास 1 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 20 हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. 

एकीकडे लोक व्हिडीओवर कमेंट करून आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे काहीजण त्यावर टीका करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठल्या ठिकाणचा आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: the man blew gold coins at the wedding video goes viral