शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 6:44 PM

या तरूणांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी या महिलेनं प्रसंगावधान दाखवत आपली साडी काढून पाण्यात फेकली. त्यानंतर २  तरूणांना वाचवण्यात या महिलांना वाचवण्यात यश आलं आहे. 

महिलांच्या शौर्याच्या अनेक कहाण्या तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. सध्या तीन महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीची एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॅममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेल्या तरूणांचा तीन महिलांनी जीव वाचवला आहे. सेंथमीज सेल्वी (३८), मुथमल (३४) आणि अनंतवल्ली (३४) ही या महिलांची नावं आहेत. तामिळनाडूच्या एका गावातील  ४ तरूण  कोट्टाराई डॅममध्ये अंघोळ करण्यासाठी गेले असता तोल जाऊन पाण्यात बुडाले. या तरूणांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी या महिलेनं प्रसंगावधान दाखवत आपली साडी काढून पाण्यात फेकली. त्यानंतर २  तरूणांना वाचवण्यास या महिलांना वाचवण्यात यश आलं आहे. 

'न्यू इंडिया एक्सप्रेस' नं दिलेल्या माहितीनुसार ही घटना ६ ऑगस्टला घडली आहे. सिरावानछूर गावातील मुलं कोट्टाराई गावात क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. खेळून झाल्यानंतर ही मुलं कोट्टाराई डॅममध्ये अंघोळ करायला गेले. गेल्या आठवड्यात भरपूर पाऊस पडल्यानं पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पाण्याची पातळी १५ ते २० फुटांपर्यंत पोहोचली होती.  हा डॅम Marudaiyaru नदीवर तयार करण्यात आला आहे. 

सेंथमीज सेल्वी या महिलेन दिलेल्या माहितीनुसार, ''जेव्हा ती मुलं त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो.  या मुलांना अंघोळीला जाताना पाहून आम्ही पाणी खोल असल्याचा इशारासुद्धा दिला होता. पण तरीही पाण्यात उतरल्यानंतर चौघांचा तोल गेल्यानं पाण्यात बुडायची वेळ आली. हे दृश्य पाहून मी जराही वेळ न घालवता अंगावरची साडी काढून पाण्यात फेकली. वेळीच पाण्यात साड्या फेकल्यानं  चारपैकी दोन तरूणांना वाचवण्यास  यश आलं. पण त्यातील दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने खूप वाईट वाटते.''

पुढे त्यांनी सांगितले की, ''पाण्यात बुडालेल्या दोन मुलांना शोधण्यासाठी आम्ही पाण्यात गेलो पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पाण्यात शोधूनही ही दोन मुलं सापडली नाहीत.'' ज्या दोन तरूणांना वाचवलं त्यातील एकाचं नाव कार्तिक आणि दुसऱ्याचं सेंथिवेलन आहे. ज्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला त्यापैकी एका तरूणाचे पविथ्रन आहे. पविथ्रनचं वय १७ वर्षे होतं. तर मृत्यू  झालेला  दुसरा तरूण २५ वर्षीय असून एक शिकाऊ डॉक्टर होता. याचं नाव रंजीथ होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर  या दोन्ही तरूणांचे मृतदेह  शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. 

हे पण वाचा :

घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!

शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो

याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल