VIDEO : खतरनाक बिबट्याने रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्यावर केला अचानक हल्ला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 15:30 IST2022-02-19T15:28:02+5:302022-02-19T15:30:53+5:30

Dog Leopard Video: हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले. कारण जेव्हा बिबट्याने अचानक एन्ट्री घेतली तेव्हा असं वाटलं होतं की, आता कुत्रा मरणार.

Street Dog and leopard fight video goes viral on social media | VIDEO : खतरनाक बिबट्याने रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्यावर केला अचानक हल्ला आणि मग....

VIDEO : खतरनाक बिबट्याने रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्यावर केला अचानक हल्ला आणि मग....

Dog Leopard Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात प्राण्यांचे अनेक व्हिडीओ लोक पसंत करता. असाच एक कुत्र्याचा आणि बिबट्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. यात एक बिबट्या अचानक येऊन रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला करतो. पण त्यानंतर जे होतं ते बघून लोक अवाक् झाले आहेत. कारण कुत्र्याच्या हिंमतीसमोर बिबट्या टिकाव धरू शकला नाही. 

हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले. कारण जेव्हा बिबट्याने अचानक एन्ट्री घेतली तेव्हा असं वाटलं होतं की, आता कुत्रा मरणार. पण कुत्र्याने ज्या पद्धतीने बिबट्याला पळवून  लावलं त्यातून एक उदाहरण कामय झालं. ते म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवा. कुत्रा बिबट्यावर जोरजोरात भुंकला आणि पळून गेला.

तसे तर बिबट्या हा शिकारीसाठी जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी मानला जातो. त्याच्यासमोर भलेभले प्राणी टिकत नाहीत. पण एका रस्त्यावरील कुत्र्याची हिंमत बघून बिबट्याला घाम फुटला आणि तो कुत्र्यासमोर सरेंडर झाला. हा खतरनाक व्हिडीओ छत्तीसगढचे जिल्हाधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 
 

Web Title: Street Dog and leopard fight video goes viral on social media