VIDEO : कोण आहेत हे लोक भौ? जे धबधब्याजवळ असे विचित्र कपडे घालून बसतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:00 IST2025-01-17T12:59:43+5:302025-01-17T13:00:50+5:30

Viral Video : असं सांगण्यात आलं की, पवित्र धबधब्याची सुरक्षा करण्यासाठी ते असं करतात आणि यांना या जमातीतील लोक 'स्पिरिट ऑफ बर्ड' म्हणतात.

Spirit birds of wii towai tribe Papua New Guinea video viral | VIDEO : कोण आहेत हे लोक भौ? जे धबधब्याजवळ असे विचित्र कपडे घालून बसतात!

VIDEO : कोण आहेत हे लोक भौ? जे धबधब्याजवळ असे विचित्र कपडे घालून बसतात!

Viral Video : वेगवेगळ्या देशातील ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतात. ज्यात वेगवेगळ्या देशांमधील अजब अजब गोष्टी आपल्याला घरबसल्या बघायला मिळतात. अनेक गोष्टी तर अशा असतात, ज्यांवर सहजपणे विश्वास बसत नाही. सध्या एका ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सरचा असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यानं पापुआ न्यू गिनीतील एका रहस्यमय आदिवासी जमातीबाबत माहिती दिली आहे. विचित्र कपडे आणि मुखवटा घालून हे लोक बसले आहेत. असं सांगण्यात आलं की, पवित्र धबधब्याची सुरक्षा करण्यासाठी ते असं करतात आणि यांना या जमातीतील लोक 'स्पिरिट ऑफ बर्ड' म्हणतात. 

ब्रिक्सटनचा राहणारा ट्रॅव्हल कंन्टेट क्रिएटर डॅनिअल पिंटोनं इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त लाइक्स आणि १.७ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या जमातीची ही प्रथा पाहून हैराण झाले आहेत.

डॅनिअलनं आपल्या व्हिडिओत पापुआ न्यू गिनीच्या हायलॅंड्समध्ये राहणाऱ्या 'वी तोवाई' जमातीतील स्पिरिट बर्ड लोकांची झलक दाखवली आहे. डॅनिअलनं व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, हे वी तोवाई जमातीतील स्पिरिट बर्ड आहे. 

डॅनिअलनं पुढं सांगितलं की, मी सध्या पापुआ न्यू गिनीच्या वी तोवाई जमातीच्या स्पिरिट बर्ड सोबत बसून आहे. हे लोक इथे धबधब्याजवळ बसतात. हा धबधबा त्यांच्यासाठी पवित्र आहे. ते याचा बाहेरील लोकांपासून आणि चुकीच्या कामांपासून बचाव करतात. त्यांचे कपडे फारच भीतीदायक असतात. त्यांना बघून लोक त्यांच्याजवळ येत नाही. तसे हे लोक कुणाला काही नुकसान पोहोचवत नाहीत.

Web Title: Spirit birds of wii towai tribe Papua New Guinea video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.