Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:51 IST2025-10-16T11:50:38+5:302025-10-16T11:51:21+5:30
मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवाशांकडून पैसे मागताना दिसत आहे.

Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील नम्मा मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवाशांकडून पैसे मागताना दिसत आहे. या व्यक्तीच्या कृतीने सर्व प्रवासी हैराण झाले आहेत. या व्हिडिओवर विविध कमेंट्स आल्या आहेत.
सोमवारी सकाळी ११:०४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या व्यक्तीने मेट्रोचं रितसर तिकीट काढलं. मॅजेस्टिक स्टेशनवरून मेट्रोमध्ये चढला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो पोलीस कर्मचारी रुटीन चेक करत असताना त्याने भीक मागणं थांबवलं आणि नंतर दसरहल्ली स्टेशनवर उतरला.
बेंगलुरु मेट्रो से एक अनोखी घटना का वीडियो सामने आया है, जिसमें एक व्यक्ति मेट्रो के अंदर बैठे यात्रियों से भीख मांगता नजर आ रहा है. इस वायरल वीडियो पर लोगों के रिएक्शन सामने आ रहे हैं. pic.twitter.com/c6gT4sI3Hj
— Abhishek Kumar (@pixelsabhi) October 15, 2025
व्हिडिओमध्ये ही व्यक्ती एकामागून एक बसलेल्या लोकांकडे जाऊन पैसे मागत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. बरेच लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, तर काहीजण त्याला पैसे देण्यास स्पष्टपणे नकार देतात. रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे, कारण मेट्रोच्या नियमांनुसार मेट्रो परिसरात भीक मागण्यास सक्त मनाई आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. काहींनी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी असं म्हटलं तर काहींनी मेट्रोमध्ये असं वर्तन पूर्णपणे चुकीचं आहे. मेट्रोचे काही नियम आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास कोणावरही कारवाई होऊ शकते असं सांगितलं. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.