Sonu sood tailor shop watchvideo shared by actor sonu sood on twitter fans funny reaction | 'इथं मोफत कपडे शिवून मिळतील'; सोनू सूद चालवतोय शिलाई मशिन; पाहा व्हायरल व्हिडीओ

'इथं मोफत कपडे शिवून मिळतील'; सोनू सूद चालवतोय शिलाई मशिन; पाहा व्हायरल व्हिडीओ

अभिनेता सोनू सूद नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनेता सोनू सूदने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ १६ जानेवारीला सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. कोणतंही काम लहान नसतं, असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. सोनूचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याची जाणीव नक्कीच होईल.

२० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सोनू सूद एखाद्या शिंप्याप्रमाणे मशिनवर खट-खट असा आवाज करत  कपड्यांवर शिलाई मारत आहे.  सुरूवातीला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनू सूद इतक्या सहजतेने शिलाई करत आहे. यावर तुमचा विश्वास बसणारच नाही. 

आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तर  ४५ हजारांपेंक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून ५ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. कोरोना लॉकडाऊननंतर आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरंच की काय? बर्गर खाणं पडलं चांगलंच महागात; मोजावे लागले तब्बल 20 हजार, 160 किमी अंतर केलं पार

सोनू सूदने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र ही एक सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे. सोनू सूदचं निवासस्थान बेकायदा असल्याचं सांगत मुंबई महानगरपालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. यानंतर आता सोनू सूदने शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. आजींकडून रेशन दुकानापर्यंतही चाललं जात नव्हतं; ९ वर्षांच्या चिमुरड्यानं 'अशी' केली मदत

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonu sood tailor shop watchvideo shared by actor sonu sood on twitter fans funny reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.