१०० पर्यंत उजळणी म्हणताना काकाची झाली फजिती...; व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:49 IST2025-08-27T13:47:51+5:302025-08-27T13:49:14+5:30
Social Media Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१०० पर्यंत उजळणी म्हणताना काकाची झाली फजिती...; व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल
Social Media Viral Video: सोशल मीडियाचा वापर सध्या खूप वाढला आहे. स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तुम्हीही सोशल मीडियाच्या अॅक्टिव्ह असाल. इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या एक्सवर एका काकांचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध काका दिसतायत. ते स्वतःलाच एका एका श्वासात १०० पर्यंत संख्या मोजण्याचे चॅलेंज देतात. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेऊन उजळणी सुरू करतात. मात्र, काही सेकंदानंतर त्यांचा आवाज बदलू लागतो. श्वास रोखून धरल्यामुळे त्यांना संख्याही नीट मोजता येत नाहीत. ५० चा आकडा ओलांडल्यानंतर त्यांच्या तोंडून निघणारे शब्धही ऐकू येत नाहीत. शेवटी कसेबसे ते शंभरपर्यंत जातात.
पाहा व्हिडिओ
रील के चक्कर चाचा मरते मरते बचे हैं...😂😂😂 pic.twitter.com/P6uW1nyo28
— Shanaya Khan (@Shanaya01786) August 26, 2025
हा व्हिडिओ @Shanaya01786 नावाच्या अकाउंटवरुन X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, 'काका मरता मरता वाचले.' व्हिडिओ पाहून एका युजरने कमेंट केली, 'शेवटी त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता.' ,दुसऱ्याने लिहिले, 'प्राण जाये पणस रील ना जाये.' आणखी एकाने लिहिले, 'काका थांब, नाहीतर तुमची उलटी गिनती सुरू होईल.' सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.