'जाऊ मैं प्लेम में'म्हणत ढिँचॅक पुजाचं नव गाणं रिलीज, लोकांनी केले कान बंद! मीम्सचा पडतोय पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 07:02 PM2021-09-16T19:02:52+5:302021-09-16T19:03:06+5:30

हे गाणं एकल्यावर लोकांनी आपले कान बंद केल्याचे मीम्स सोशल मिडियावर शेअर केले आहे. या गाण्यानंतर सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडतो आहे. ढिंचॅक पुजा ही युट्यूबस्टार तिच्या बेसुऱ्या आवाजातील गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

social media star dhinchak pooja's new song release jaau mein plane mein, memes shared on social media | 'जाऊ मैं प्लेम में'म्हणत ढिँचॅक पुजाचं नव गाणं रिलीज, लोकांनी केले कान बंद! मीम्सचा पडतोय पाऊस

'जाऊ मैं प्लेम में'म्हणत ढिँचॅक पुजाचं नव गाणं रिलीज, लोकांनी केले कान बंद! मीम्सचा पडतोय पाऊस

Next

सोशल मिडिया स्टार ढिँचॅक पुजा हिनं तिचं नव गाण रिलीज केलंय. या गाण्यात ती विमानात बसून  ‘जाऊं मैं प्लेन में’ असं म्हणतेय. हे गाण रिलीज होताच त्याला लाखो व्हिव्ज मिळाले. मात्र हे गाणं एकल्यावर लोकांनी आपले कान बंद केल्याचे मीम्स सोशल मिडियावर शेअर केले आहे. या गाण्यानंतर सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडतो आहे. ढिंचॅक पुजा ही युट्यूबस्टार तिच्या बेसुऱ्या आवाजातील गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

ढिंचॅक पूजाचं ‘जाऊं मैं प्लेन में’ हे नवं गाणं रिलीज झालं आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर तीने आपलं गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्याला काही मिनिटांमध्ये लाखो लोकांनी पाहिलेलं आहे. ढिंचॅक पूजा या गाण्यात विमानात बसून गाणं गाताना दिसत आहे. पूजाचं हेच गाणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

ढिंचॅक पूजाने तिचं गाणं रिलीज केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर केले जात आहेत. एका नेटकऱ्याने तर आता मला कोणतंही गाणं ऐकण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ढिंचॅक पूजाचे गाणे ऐकूण माझी कोणतीही शेवटची इच्छा राहिली नाही, असं मिश्किल भाष्य केलंय. दरम्यान, ढिंचॅक पूजने आपल्या नव्या गाण्याबाबत १४ सप्टेंबर रोजी तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन अधिकृत घोषणा केली होती. यामध्ये तीने माझे नवे गाणे न विसरता ऐका असं म्हटलं होतं.

Web Title: social media star dhinchak pooja's new song release jaau mein plane mein, memes shared on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app