फ्लाईटच्या आतमध्ये बसला होता लांबलचक साप, प्रवाशांचा उडाला एकच गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:40 PM2021-08-08T17:40:55+5:302021-08-08T17:43:10+5:30

सापाचं नाव जरी काढलं तरी धडकी भरते. हा साप (snake) तुमच्या समोरच येऊन उभा राहिला तर? तुम्ही एखाद्या जंगलात असाल तर हे शक्यही आहे पण तुम्ही कल्पनाही करू शकत नसेल अशा ठिकाणी साप सापडलाय...

snake in indigo plane in Kolkata, video goes viral | फ्लाईटच्या आतमध्ये बसला होता लांबलचक साप, प्रवाशांचा उडाला एकच गोंधळ

फ्लाईटच्या आतमध्ये बसला होता लांबलचक साप, प्रवाशांचा उडाला एकच गोंधळ

Next

सापाचं नाव जरी काढलं तरी धडकी भरते. हा साप (snake) तुमच्या समोरच येऊन उभा राहिला तर? तुम्ही एखाद्या जंगलात असाल तर हे शक्यही आहे पण तुम्ही कल्पनाही करू शकत नसेल अशा ठिकाणी साप सापडलाय. कोलकातामध्ये (Kolkata)विमानतळाच्या रनवेवर फिरणाऱ्या सापाचा व्हिडिओ (Snake Video) सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. या घटनेनंतर प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.

द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार इंडिगो एअरलाइन्सची फ्लाईट कोलकाताहून मुंबईला येत होती. इतक्यात फ्लाईटमध्ये साप असल्याचं आढळून आलं. जेव्हा स्टाफनं पाहिलं की फ्लाईटच्या आतमध्ये साप आहे, तेव्हा सर्वांचाच थरकाप उडाला. ही फ्लाईट कोलकाताहून मुंबईला निघाली होती. मात्र आपलं सामान ठेवण्यासाठी प्रवासी कर्मचाऱ्यांच्या कार्गोपर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांना दिसलं, की आतमध्ये एक मोठा साप बसलेला आहे. हा साप वेगात इकडे-तिकडे फिरत फ्लाईटमध्ये शिरला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की साप रस्त्यावर वेगात चालत आहे आणि तो प्लेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेची माहिती एअरपोर्ट अथॉरिटीला दिली गेली. यानंतर वनविभागाला याबाबत सांगण्यात आलं. वनविभागाच्या टीमनं सापाला रेस्क्यू करून आपल्यासोबत नेलं. यानंतर प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी वेगळ्या विमानाची व्यवस्था केली गेली. सोशल मीडियावर एका यूजरनं या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ पाहुन नेटकरीही चांगलेच घाबरलेयत. कमेंटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Web Title: snake in indigo plane in Kolkata, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.