तुम्ही फक्त पक्ष्याचं नाव सांगा, हा चिमुकला काढतो असा हुबेहुब आवाज की ऐकतच राहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 19:04 IST2021-08-19T18:58:36+5:302021-08-19T19:04:16+5:30
फक्त पक्ष्याचं किंवा प्राण्याचं नाव सांगण्याची खोटी की हा चिमुकला चटकन हुबेहुब आवाज काढतो.इतक्या कमी वयाच या मुलाचं असं टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झालेत.

तुम्ही फक्त पक्ष्याचं नाव सांगा, हा चिमुकला काढतो असा हुबेहुब आवाज की ऐकतच राहाल!
लहान मुलांना कावळ्याचा आवाज कसा असतो असं विचारलं तर कावळा काव-काव करतो. चिमणी चिव-चिव करते असं ते बोबड्या आवाजात सांगतो. मात्र फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधील चिमुकल्याकडे असं टॅलेंट आहे की तो पशुपक्ष्यांचा आवाज सांगत नाही तर अगदी काढून दाखवतो (Talented Kid Video). सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा चिमुकल्याचा हा व्हिडीओ (Viral Video) पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
फेसबुकवर या मुलाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती मुलाला पक्ष्यांची, प्राण्यांची नावं सांगत जातो आणि तो त्यांचा अगदी तसाच आवाज काढून दाखवतो. फक्त पक्ष्याचं किंवा प्राण्याचं नाव सांगण्याची खोटी तो चटकन हुबेहुब आवाज काढतो.इतक्या कमी वयाच या मुलाचं असं टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झालेत. या मुलाच्या टॅलेंटचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. फेसबुकवर या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.