Viral Video: ट्यूशनवरून परतणाऱ्या मुलींचा पाठलाग आणि अश्लील कमेंट्स; कुठे घडला 'हा' संतापजनक प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:50 IST2026-01-06T14:49:05+5:302026-01-06T14:50:31+5:30
Uttar Pradesh Mainpuri Schoolgirls Harassed Video: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून महिला सुरक्षेच्या चिंधड्या उडवणारा एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.

Viral Video: ट्यूशनवरून परतणाऱ्या मुलींचा पाठलाग आणि अश्लील कमेंट्स; कुठे घडला 'हा' संतापजनक प्रकार?
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून महिला सुरक्षेच्या चिंधड्या उडवणारा एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. ट्यूशनवरून घराकडे परतणाऱ्या शाळकरी मुलींची दुचाकीवरून आलेल्या काही टवाळखोर तरुणांनी छेडछाड केली. भररस्त्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरीमधील एका अरुंद गल्लीतून काही मुली ट्यूशन संपवून घरी परतत होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या काही हुल्लडबाज तरुणांनी या मुलींचा पाठलाग सुरू केला. हे तरुण मुलींच्या अगदी जवळून दुचाकी चालवत होते आणि त्यांच्यावर अश्लील कमेंट्स करत हुल्लडबाजी करत होते. तर, मुली अत्यंत घाबरलेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेत आहेत. दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडत असतानाही कोणीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. या टवाळखोरांनी मुलींचा रस्ता अडवण्याचा आणि त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला.
लड़कियां पतली गली से ट्यूशन पढ़कर आ रहीं हैं, बाइक पर सवार हुड़दंग करते हुए जा रहे हैं. लड़कियों पर कमेंट कर रहे हैं.
— Priya singh (@priyarajputlive) January 5, 2026
लड़कियां डरी सहमी हुई हैं. यह सबकुछ दिन दहाड़े हो रहा है. वायरल वीडियो यूपी के मैनपुरी की है. pic.twitter.com/PP8PNsSUkc
नागरिकांमध्ये संताप
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी याची दखल घेतली. मैनपुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, व्हिडिओमधील दुचाकीच्या नंबरवरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.भरवस्तीत मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी शिक्षण घ्यायला बाहेर कसे पडायचे, असा संताप पालकांकडून व्यक्त होत आहे.