Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:23 IST2026-01-13T19:21:36+5:302026-01-13T19:23:10+5:30
Expensive Moisturizer Viral Video: आजकाल सोशल मीडियाच्या नादात काय काय विकलं जातंय आणि लोक काय खरेदी करतायत, याचा नेम उरला नाहीये! एका मुलीने इंस्टाग्रामवर ट्रेंड होणारं चक्क ५,८०० रुपयांचं मॉइश्चरायझर खरेदी केलं. पण जेव्हा तिने त्यात काय आहे? हे आपल्या वडिलांना सांगितलं, तेव्हा काकांचा जो पारा चढलाय... ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
आजच्या सोशल मीडियाच्या युगात नवनवीन उत्पादनांचे रिव्ह्यू करणे हा एक ट्रेंड बनला आहे. मात्र, कधीकधी हे रिव्ह्यू इतके विचित्र असतात की, ते पाहून कोणालाही धक्का बसू शकतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलीने महागड्या मॉइश्चरायझरबद्दल दिलेली माहिती आणि त्यावर तिच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी सांगते की, इंस्टाग्रामवर सध्या एक मॉइश्चरायझर खूप चर्चेत आहे. केवळ ट्रेंड फॉलो करण्यासाठी तिने ते मॉइश्चरायझर ऑर्डर केले. जेव्हा तिने या छोट्याशा डबीची किंमत ५,८०० रुपये असल्याचे सांगितले, तेव्हा तिच्या वडिलांना मोठा धक्काच बसला.
वडील आश्चर्याने आपल्या पत्नीला म्हणाले की, "बघ, ही कशी पैसे वाया घालवतेय!" त्यावर मुलीने साधेपणाने उत्तर दिले की, "मी ते माझ्या चेहऱ्यावर लावते." गंमत इथेच संपत नाही. व्हिडिओमध्ये पुढे मुलगी एक असा खुलासा करते जो ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते की, "या मॉइश्चरायझरमध्ये मांजरीची विष्ठा आहे." हे ऐकताच वडिलांना दुसरा मोठा धक्का बसतो. जेव्हा मुलगी त्यांना मॉइश्चरायझरचा वास घेण्यास सांगते, तेव्हा वैतागलेले वडील तिला "तू काही दिवस माझ्यापासून दूरच राहा" असा सज्जड दम भरतात.
5800 rs का p0op 0f Cat है, वो छोड़ो...
— ताज़ा तमाचा (@Taza_Tamacha) January 13, 2026
भाई मैं तो जीवन में कभी हाथ का पानी ना पियूं...!
🥴🥴😓 pic.twitter.com/5kSdQdqrIE
हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर @Taza_Tamacha नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, "हा तर मेकअपवर मेकअप केला जात आहे!" दुसऱ्या एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले, "भाऊ, आजकाल फॅशनच्या नावाखाली मुली काहीही फालतू गोष्टींवर पैसे वाया घालवत आहेत, यात शंकाच नाही."