Shiv Jayanti 2021 : शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो व्हायरल...तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 14:06 IST2021-02-19T13:56:23+5:302021-02-19T14:06:12+5:30
Shivaji Maharaj Hand Print : छत्रपती शिवाजी महाराज(Shivaji Maharaj) यांच्या हाताचे ठसे असलेला फोटो सद्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Shiv Jayanti 2021 : शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो व्हायरल...तुम्ही पाहिला का?
Shivaji Maharaj Hand Print : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती(Shivjayanti) आज साजरी केली जात आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सोशल मीडियावर त्यांच्याविषय खूप लिहिलं जातंय आणि त्यांच्या अनेक गोष्टी शेअर केल्या जात आहेत. अशात त्यांच्याशी संबंधित एका खास फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोची खासियत म्हणजे यात शिवाजी महाराजांच्या एका हाताचा ठसा(Hand Print) आहे. हा ठसा चंदनाच्या लेपाचा असल्याचा दावा केला जात आहे.
शिवाजी महाराज यांच्या अनेक गोष्टी अजूनही लोकांसमोर आलेल्या नाहीत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या हाताचा आणि पायांचा ठसा आहे. पण तो जोपसण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीयेत. किल्ल्यावरील एका छोट्या मंदिरात त्यांचे हे पायांचे आणि हाताचे ठसे आहेत. अशात आता त्यांच्या हाताचा ठसा असलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. Directorate of Archaeology and Museums, Maharashtra चे Director तेजस गर्गे यांनी त्यांच्या पेजवर हा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या वॉलवरून हा फोटो अनेकांनी शेअर केला. (हे पण बघा : Shiv Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसायचे?; बघा जगभरातील त्यांची 'ही' चित्रे....)
अर्थातच शिवाजी महाराजांचा हा हाताचा ठसा अनेकांनी आधी पाहिला नसेल. त्यामुळे याबाबत अनेकांना आनंद आहे. शिवाजी महाराजांची ही खूण सातारा येथील संग्रहालयात असल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितले. त्यांनी आजच्या दिवसाचा संबंध या फोटोशी असल्याचे सांगितले. तर सिनेदिग्दर्शक अक्षय इंडिकर यानेही त्यांच्या वॉलवरील हा फोटो शेअर केला असून त्यात स्पष्टपणे हे शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे असल्याचे म्हटले आहे.