शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 15:12 IST2025-08-15T15:12:25+5:302025-08-15T15:12:45+5:30
Shashi Tharoor English Tweet Memes : नेहमी भल्याभल्यांची इंग्लिशने विकेट काढणारे शशी थरूरही चक्रावले, असं काय घडलं...

शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
Shashi Tharoor English Tweet Memes : काँग्रेस खासदार शशी थरूर हे त्यांच्या अद्भुत इंग्रजी शब्दांच्या ज्ञानासाठी ओळखले जातात. ते अनेकदा असे शब्द वापरतात की त्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी लोकांना शब्दकोश उघडावा लागतो. पण यावेळी एका एक्स वापरकर्त्याने त्यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देऊन आश्चर्यचकित केले. वापरकर्त्याने इतके कठीण इंग्रजी शब्द वापरले की, शशी थरूरही गोंधळून गेले.
गुरुवारी संध्याकाळी थरूर यांनी एक्सवर ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी लिहिले, I hear some people are accusing India of being ‘recalcitrant’. I say, far better to be recalcitrant, than to be tractable, submissive or acquiescent to injustice. याचा अर्थ असा होतो की- मी ऐकले आहे की काही लोक भारतावर 'हट्टी' असल्याचा आरोप करत आहेत. माझा असा विश्वास आहे की झुकण्यापेक्षा, अवलंबून राहण्यापेक्षा किंवा अन्यायाला मूकसंमती देण्यापेक्षा हट्टी असणे कधीही चांगले आहे.
यावर, @sagarcasm.ex या हँडलच्या एका वापरकर्त्याने थरूर यांना त्यांच्याच शैलीत इंग्रजीत अशा प्रकारे उत्तर दिले की ते वाचल्यानंतर थरूरही क्लीन बोल्ड झाले. वापरकर्त्याने लिहिले की- That’s fine Shashi but what about the abnegation of camaraderie in the egregious enfranchise that comes from the fatuous of the grandiloquent at the behest of impecunious and insidious semaphore?
शशी थरूर क्लीन बोल्ड...
नेटकऱ्याचे विचित्र उत्तर वाचून शशी थरूर स्वतःही चक्रावून गेले. त्यांनी त्या युजरला विचारले- भाऊ, तुम्हाला काय म्हणायचे आहे? थरूर आणि या युजरमधील संभाषणाबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अनेकांनी या घटनेची मजा घेत मीम्स तयार केले.