Video: सीमा हैदरने लाल रंगाची साडी नेसून केला भन्नाट डान्स; व्हिडीओ झालाय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:30 IST2023-07-18T17:21:54+5:302023-07-18T17:30:02+5:30

सीमाला ATS ने ताब्यात घेतलं असताना तिचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय

Seema Haider Dance Video viral in Red Saree old clip of hot dancing watch | Video: सीमा हैदरने लाल रंगाची साडी नेसून केला भन्नाट डान्स; व्हिडीओ झालाय व्हायरल

Video: सीमा हैदरने लाल रंगाची साडी नेसून केला भन्नाट डान्स; व्हिडीओ झालाय व्हायरल

Seema Haider Dance Video: नुकतीच आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतात दाखल झालेली पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर तिच्या प्रत्येक वाक्याने आणि प्रत्येक गोष्टीने चर्चेत येत आहे. आता सीमा हैदरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लाल साडी नेसून एका भारतीय गाण्यावर नाचत आहे आणि काही महिला तिच्यावर नोटांचा वर्षाव करत आहेत. पाकिस्तानी महिला सीमा हैदर ऑनलाइन गेम PUBG खेळताना ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावातील सचिन मीना या भारतीय पुरुषाच्या प्रेमात पडली. पण सध्या ती पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते असा संशय व्यक्त करत तिला उत्तर प्रदेशएटीएसने ताब्यात घेतले आहे. त्याआधी बरेच दिवस सीमा सचिनसोबत होती. त्यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सीमा हैदरचा लाल साडीतला डान्स व्हायरल

सीमाने हिंदू धर्म स्वीकारला असून तिला पाकिस्तानात परतायचे नसल्याचे सांगितले जात आहे. सीमा (30) आणि सचिन (25) यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात असल्याबद्दल अटक केली होती, परंतु उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्यांना जामीन मंजूर केला. 4 जुलै रोजी, सचिन आणि सीमा या दोघांनी मीडिया आणि पोलिसांसमोर एकमेकांवरील प्रेम असल्याचे सांगितले आणि त्यांना भारतात लग्न करण्याची आणि एकत्र राहण्याची परवानगी देण्याची विनंती सरकारला केली. या व्हिडीओमध्ये सीमा हुबेहूब भारतीय महिलेप्रमाणे नाचत असून ती पाकिस्तानातून आली आहे असे अजिबात वाटत नाही. पाहा तिचा व्हिडीओ-

दरम्यान, सीमा हैदर 4 मुलांची आई आहे. ती म्हणाली की, PUBG गेम खेळताना सचिनच्या प्रेमात पडले आणि त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, सीमाचा पाकिस्तानमधील पती गुलाम हैदर हा सातत्याने व्हिडीओ जारी करत आहे आणि भारत सरकारकडे त्याच्या पत्नीला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करत आहे. मात्र सचिनसोबत लग्न करून आनंदी असल्याचे सीमाचे म्हणणे आहे. सध्या सीमाच्या या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. एटीएस सीमा हैदरची चौकशी करणार आहे. इंटेलिजन्स ब्युरोने सीमाबद्दल गोळा केलेली माहिती एटीएसला दिली आहे.

Web Title: Seema Haider Dance Video viral in Red Saree old clip of hot dancing watch