प्रत्येकवेळी जमिनीवर झोपूनच फोटू का काढत असावी ही बया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 13:53 IST2019-04-19T13:52:07+5:302019-04-19T13:53:54+5:30

काही दिवसांपासून एका तरुणीच्या विचित्र फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता हाच फोटो बघा ना.

See pics this artist against selfie culture capture image by laid down | प्रत्येकवेळी जमिनीवर झोपूनच फोटू का काढत असावी ही बया?

प्रत्येकवेळी जमिनीवर झोपूनच फोटू का काढत असावी ही बया?

(Image Credit : thesun.co.uk)

काही दिवसांपासून एका तरुणीच्या विचित्र फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता हाच फोटो बघा ना. हा आहे आयफेल टॉवर आणि त्याच्या खाली झोपलेली तरुणी आहे Stephanie Leigh Rose. ती एक आर्टिस्ट आहे. तिला प्रवास करण्याची आवड आहे. पण तिची फोटो काढण्याची स्टाइल मात्र फारच विचित्र आणि बुचकळ्यात टाकणारी आहे. ती सेल्फी न काढता जमिनीवर झोपते आणि फोटो काढते. 

पण असं का करते?

Stephanie सांगते की, ती एक कलाकार या नात्याने असे फोटो काढते. STEFDIES हे तिचं इन्स्टाग्राम पेज असून यावर असे कितीतरी फोटो तुम्ही बघू शकता. ती या फोटोंना तिच्या पेजवर ह्यूमर मानते आणि या फोटोंना एक आर्ट.

ती सांगते की, तिचे सर्व फोटो हे इन्फर्मेटिव्ह असतात. म्हणजे जी आयडिया येईल त्याचा ती फोटो काढते. तिचं मत आहे की, सेल्फीच्या वाढत्या कल्चरमुळे अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढणे गरजेचं झालं आहे. एक दिवस यातीलच एकाचा प्रकार ट्रेन्डही बनू शकतो.

ती जगभरातील फिरते आणि तेथील सर्वात लोकप्रिय ठिकाणावर जाऊन अशाप्रकारे फोटो काढते. यावेळी आजूबाजूचे लोकही तिला अशाप्रकारे फोटो काढताना पाहून हैराण होतात. काहीही असो पण सध्या तिच्या या फोटोंची चर्चा सोशल मीडियाच चांगलीच रंगली आहे.

Web Title: See pics this artist against selfie culture capture image by laid down