सारा तेंडुलकर मराठीत बोलली, आजीची गोड आठवण सांगितली; Viral Video पाहून नेटकरी फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:54 IST2026-01-08T11:50:21+5:302026-01-08T11:54:32+5:30
Sara Tendulkar Marathi Speech Video: सारा तेंडुलकर नवी मुंबईतील एका कार्यक्रमात व्यासपीठावरून खणखणीत मराठी बोलली

सारा तेंडुलकर मराठीत बोलली, आजीची गोड आठवण सांगितली; Viral Video पाहून नेटकरी फिदा
Sara Tendulkar Speaking Marathi Viral Video: बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची मुलं हा भारतात कायम चर्चेचा विषय असतो. त्यात क्रिकेटपटूंचे जीवन आणि त्यांची मुले हा विषय देखील विशेष चर्चिला जातो. भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हीदेखील सातत्याने विविध कारणांनी प्रकाशझोतात असते. अलीकडेच साराने एका सोन्याच्या ज्वेलरी ब्रँडच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. नवी मुंबईतील या दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळी सारा तेंडुलकरनेमराठीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे सारा तेंडुलकर आता मराठी भाषेतील तिच्या छोटाशा भाषणामुळे चर्चेत आली आहे.
सारा तेंडुलकर ही सचिनची लेक असली तरीही ती फारशी मराठीत बोलताना दिसली नव्हती. पण नवी मुंबईतील कार्यक्रमात साराने अस्खलित मराठीत आपल्या आजीची एक आठवण सांगितली. मला एक गोष्ट मला मराठीत सांगायची आहे अशी सुरुवात करत ती म्हणाली, "मी जेव्हा लहान होते, तेव्हा माझी आजी मला नेहमी छोटीशी का असेना पण सोन्याची वस्तू द्यायची. ती कधी कानातले द्यायची, कधी गळ्यातली चेन द्यायची. तेव्हापासून माझं एकच स्वप्न होतं की मी एक दिवस मोठी झाल्यावर माझ्या स्वत:च्या पैशाने माझ्या आजीसाठी सोन्याचं काहीतरी विकत घेऊन तिला देईन. ते स्वप्न आज पूर्ण झालं."
सारा तेंडुलकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती ज्या पद्धतीने मराठी बोलली आहे, त्यावरून तिचे मराठी चाहते तिचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. तू महाराष्ट्राची आहेस, याचा आम्हाला अभिमान आहे, असे एकाने लिहिले आहे. तर दुसऱ्याने सारा खूप छान मराठी बोलते असे म्हटले आहे.