शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Russia Ukrain war : रशियानं टाकला विशाल बॉम्ब, युक्रेनच्या सैनिकांनी पाणी टाकून केला डिफ्यूज; बघा थरकाप उडवणारा VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:49 IST

या व्हिडिओत युक्रेनचे सैनिक रशियाने टाकलेला एक विशाल बॉम्ब डिफ्यूज अथवा निकामी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ते यासाठी पाण्याचा वापर करताना दिसत आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या वीस लाखांहून अधिक लोकांनी देश सोडला आहे. या युद्धात युक्रेनची प्रमुख शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. युद्ध सुरू होऊन 14 दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही रशियाला युक्रेनची राजधानी किव्हवर ताबा मिळवता आलेला नाही. जगातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. युक्रेनमधून अनेक व्हिडिओही समोर येत आहेत. (Russia and ukraine war videos)

यातच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नसली तरी, या व्हिडिओत युक्रेनचे सैनिक रशियाने टाकलेला एक विशाल बॉम्ब डिफ्यूज अथवा निकामी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ते यासाठी पाण्याचा वापर करतात आणि आपला जीव धोक्यात घालून बॉम्ब डिफ्यूज करतात.

इमारत उडविण्यासाठी फेकला होता बॉम्ब -हा व्हिडिओ ट्विटर युजर @Charles_Lister ने शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले, रशियाने हा बॉम्ब एक इमारत उडविण्यासाठी टाकला होता. मात्र, युक्रेनियन्सनी तो दोन हात आणि एका पाण्याच्या बाटलीने डिफ्यूज केला. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, की एक व्यक्ती बॉम्बवर पाणी टाकत आहे आणि दुसरी व्यक्ती अत्यंत शांत पणे बॉम्ब डिफ्यूज करत आहे आणि अखेर हे दोघे बॉम्बचा वरचा भाग बॉम्बपासून वेगळा करण्यात यशस्वी होतात. वृत्त लिहेपर्यंत जवळपास 20 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता.

व्हिडिओ पाहताना लोकांचा श्वासही थांबला - खरे तर, हा व्हिडीओ पाहून आनेकणी, या बॉम्बरवर पांढरा कापड का टाकला आहे, असा प्रश्नही उपस्थित केला. तर, काही लोक या सैनिकांचे हे काम पाहून भयभीतही झाले. एका युजरने लिहिले, येथे कॅमेरामननेही छान आणि धाडसाचे काम केले आहे. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ पाहताना, काही अनर्थ होऊ नये, या काळजीपोटी आमचा श्वासही थांबला होता, असेही युजर्सनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाBombsस्फोटकेSoldierसैनिकSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल