VIDEO : जंगली रेड्याने घेतला खतरनाक गेंड्यासोबत पंगा, मग जे झालं ते बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 12:49 IST2021-10-02T12:46:54+5:302021-10-02T12:49:47+5:30

गेंड्याने ज्या ताकदीने आणि वेगाने रेड्याला टक्कर दिली ती खरच खतरनाक आहे. इतकंच नाही तर टक्कर इतकी जोरदार होती की, रेडा हवेत फेकला गेला.

Rhino and buffalo fight video goes viral you will shock | VIDEO : जंगली रेड्याने घेतला खतरनाक गेंड्यासोबत पंगा, मग जे झालं ते बघाच....

VIDEO : जंगली रेड्याने घेतला खतरनाक गेंड्यासोबत पंगा, मग जे झालं ते बघाच....

गेंडा हा फारच शानदार-दमदार प्राणी आहे. दिसायला तर तो गरिब  प्राणी वाटतो, पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो कुणाचं ऐकत नाही. एका गेंडा आणि रेड्याच्या फायटिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. यात गेंड्याने ज्या ताकदीने आणि वेगाने रेड्याला टक्कर दिली ती खरच खतरनाक आहे. इतकंच नाही तर टक्कर इतकी जोरदार होती की, रेडा हवेत फेकला गेला.

हा व्हिडीओ Kariega Game Reserve चा आहे. हा पार्क दक्षिण आफ्रिकेत आहे. Braden Colling ने हा व्हिडीओ शेट केला आहे. ते त्यावेळी जंगल सफारी करत होती. तेव्हाच त्यांना दिसलं की, एक रेडा आणि गेंड्याची फाइट सुरू आहे. रेडा आपल्या ग्रुपला सोडून एकटाच गेंड्यासोबत लढत आहे. 

जसा रेडा आपल्या खतरनाक शिंगानी गेंड्यावर वार करतो. तेव्हा गेंडा आधी आपला बचाव करतो.  यानंतर गेंड्याला राग येतो. तो रेड्यावर पूर्ण जोशने वार करतो. ज्यामुळे रेडा हवेत फेकला जातो. त्यानंतर गेंडा पुन्हा त्याच्यावर वार करतो. रेड्याची हालत खराब होते आणि तो नंतर त्याच्या कळपाकडे पळून जातो.
 

Web Title: Rhino and buffalo fight video goes viral you will shock