पाण्यात मजामस्ती करतोय हा सुरेख दुर्मिळ प्राणी, नयनरम्य दृश्य पाहुन नेटकरी पडले प्रेमात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:27 IST2022-08-23T14:14:28+5:302022-08-23T14:27:45+5:30

वाढत्या शहरीकरणात वन्यप्राणी पाहणे ही मोठी दुर्मिळ बाब आहे. हेच कारण आहे की, जेव्हा प्राण्यांशी संबंधित एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर येते, तेव्हा तो अधिकाधिक व्हायरल (Viral) होतो.

rare white moose taking bath video goes viral on social media | पाण्यात मजामस्ती करतोय हा सुरेख दुर्मिळ प्राणी, नयनरम्य दृश्य पाहुन नेटकरी पडले प्रेमात...

पाण्यात मजामस्ती करतोय हा सुरेख दुर्मिळ प्राणी, नयनरम्य दृश्य पाहुन नेटकरी पडले प्रेमात...

निसर्गाने (Nature) मानवाला निसर्गाच्या रूपात अनोख्या देणग्या दिल्या आहेत. खरं तर या निसर्गाची किंमत माणसालाच नाही. निसर्गाची किमया काही औरच. आता हा प्राणीच बघा. हा प्राणी, याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. वाढत्या शहरीकरणात वन्यप्राणी पाहणे ही मोठी दुर्मिळ बाब आहे. हेच कारण आहे की, जेव्हा प्राण्यांशी संबंधित एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर येते, तेव्हा तो अधिकाधिक व्हायरल (Viral) होतो.

एक प्राणी लोकांमध्ये चर्चेत आहे. जो तुम्ही यापूर्वी क्वचितच पाहिला असेल? व्हिडिओत एक दुर्मिळ प्राणी पाण्यात जाऊन स्वतःला थंड करण्यासाठी अंघोळ करताना दिसत आहे. प्राणी आपल्या शरीराला आराम देण्यासाठी आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी ज्या प्रकारे प्रवेश करतो ते खरोखर नयनरम्य आहे. मग तो बाहेर येऊन स्वत:च पडतो आणि पाण्याचे शिंतोडे उडवतो, जे अतिशय सुंदर दिसते. या प्राण्याला पाहिल्यावर आपल्याला प्रश्नही पडतो हा कुठला प्राणी?  हा आहे व्हाईट मुस!

27 सेकंदाचा हा व्हिडिओ @Gabriele_Corno नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांना पसंत पडत आहे. याच कारणामुळे अनेक युझर्सनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रियाही नोंदवली. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, हे दृश्य खरोखरच विलक्षण आहे की मी या प्राण्याच्या प्रेमात पडलो. त्याचवेळी आणखी एका युझरने लिहिले की, प्राणीही अशा प्रकारे पाण्याचा आनंद घेऊ शकतात, हे मी पहिल्यांदा पाहिले..! विलक्षण!. याशिवाय इतरही अनेक युझर्सनी वेगवेगळ्या प्रकारे या व्हिडिओचं कौतुक केलं.

Web Title: rare white moose taking bath video goes viral on social media