अद्भूत! आसामच्या जंगलात दिसलं दुर्मिळ पांढरं हरीण, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 12:14 PM2021-06-18T12:14:30+5:302021-06-18T12:15:53+5:30

हा दुर्मीळ फोटो IFS अधिकारी सुशांता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला. आतापर्यंत या फोटोला १५०० पेक्षा जास्त लाइक्स आणि साधारण १५० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.

Rare white hog deer in Kaziranga National Park Assam viral pic by Jayanta Kumar Sarma | अद्भूत! आसामच्या जंगलात दिसलं दुर्मिळ पांढरं हरीण, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अद्भूत! आसामच्या जंगलात दिसलं दुर्मिळ पांढरं हरीण, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Next

आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये एका कॅमेरात एका दुर्मिळ पांढऱ्या हरणाचा फोटो कैद झाला आहे. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. लोकांना विश्वासही बसत नाहीये की, हरणाचा रंगही पांढरा आहे. अनेकांनी ट्विटरवर लिहिले की, त्यांनी पहिल्यांचा पांढऱ्या रंगाचं हरीण पाहिलं. कारण सामान्यपणे हरणांचा रंग भुरका असतो. हा दुर्मिळ फोटो IFS अधिकारी सुशांता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला. आतापर्यंत या फोटोला १५०० पेक्षा जास्त लाइक्स आणि साधारण १५० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.

हा फोटो अधिकारी सुशांता नंदा यांनी गुरूवारी ट्विटरवर शेअर केला होता. त्यांनी सांगितलं की, काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ पांढरा हॉग हरीण दिसला. हा दुर्मिळ आणि अद्भुत फोटो जयंत कुमार सरमा यांनी क्लिक केला आहे. (हे पण बघा : आबरा का डाबरा! 'या' ऐतिहासिक फोटोत लपलाय एक वाघ, पण लोकांना फक्त झाडेच दिसत आहेत!)

न्यूज एजन्सीनुसार, काझीरंगा नॅशनल पार्कचे DFO रमेश गोगोई म्हणाले की, या दुर्मिळ पांढऱ्या हरणाला काही दिवसांआधी पार्कमध्ये पाहण्यात आलं होतं. हे हरीण कधी कधी पार्कच्या बाहेर जातं आणि दुसऱ्या हरणांसोबत फिरतं आणि गवत खातं.

DFO रमेश गोगोई म्हणाले की, हरणाचा पांढरा रंग पूर्णपणे आनुवांशिक आहे. जो जीनमध्ये काही बदलांमुळे होतो. हे हरीण वेगळ्या प्रजातीचं नाव नाही. त्यांनी पुढे सांगितलं की काझीरंगा नॅशनल पार्कमद्ये एकूण ४० हजार हॉग हरणांपैकी एक किंवा दोन प्रकारचे दुर्मिळ पांढरे हरीण आढळू शकतात.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rare white hog deer in Kaziranga National Park Assam viral pic by Jayanta Kumar Sarma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app