Video - गुगल मॅप्सने दिला धोका, रात्री रस्ता चुकली परदेशी महिला; रॅपिडो ड्रायव्हर बनली देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:01 IST2026-01-13T12:01:17+5:302026-01-13T12:01:46+5:30
सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, रात्री साधारण १० वाजता एक परदेशी महिला रस्ता चुकली होती.

Video - गुगल मॅप्सने दिला धोका, रात्री रस्ता चुकली परदेशी महिला; रॅपिडो ड्रायव्हर बनली देवदूत
सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, रात्री साधारण १० वाजता एक परदेशी महिला रस्ता चुकली होती. गुगल मॅप्सने तिला धोका दिला, काम करणं बंद केलं होतं आणि ती पूर्णपणे एकटी व घाबरलेली होती. आसपास मदतीसाठी कोणीही दिसत नव्हतं, अशाच वेळी तिथे एक रॅपिडो महिला ड्रायव्हर पोहोचली.
व्हिडिओनुसार, परदेशी महिला समुद्रकिनाऱ्याजवळ रस्ता चुकली होती. अंधार, अनोळखी जागा या परिस्थितीमुळे ती खूप घाबरली होती. अशा वेळी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं कठीण असतं. 'सिंधू कुमारी' असं नाव असणाऱ्या रॅपिडो ड्रायव्हरने त्या परदेशी महिलेची अवस्था पाहून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. तिने आधी महिलेला 'तू सुरक्षित आहेस' असा विश्वास दिला आणि त्यानंतर तिला तिच्या हॉटेलपर्यंत सोडण्याची जबाबदारी घेतली. व्हिडिओमध्ये सिंधू कुमारी पूर्ण आत्मविश्वासाने त्या महिलेला 'हॉटेल कोकोनट'पर्यंत सुरक्षित पोहोचवताना दिसत आहे.
India : At 10 PM, a foreign woman got lost, alone and terrified after Google Maps failed. With no one around, Rapido rider Sindhu Kumari stopped, reassured her, and safely dropped her to Hotel Coconut, turning fear into relief. Salute to this brave Indian woman rider. pic.twitter.com/EFctvbip1J
— Baba Banaras™ (@RealBababanaras) January 12, 2026
हॉटेलवर पोहोचताच परदेशी महिला भावूक झाली आणि तिने रॅपिडो ड्रायव्हरला मिठी मारून तिचे आभार मानले. ती महिला थरथर कापत होती आणि तिच्या डोळ्यात भीतीसोबतच सुटकेचा आनंदही स्पष्ट दिसत होता. हा क्षण व्हिडिओमध्ये कैद झाला असून त्याने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडिओ 'X' वर @RealBababanaras नावाच्या युजरने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गुगल मॅप्स फेल झाल्यानंतर रॅपिडो रायडर सिंधू कुमारीने मदत केली.
व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेकांनी लिहिलं की, 'भारताला अशा आणखी महिला ड्रायव्हर्सची गरज आहे'. कोणी याला 'रिअल भारत' म्हटलं, तर कोणी याला 'माणुसकीचं उत्तम उदाहरण' म्हटलं. एका युजरने लिहिलं की, 'रात्री १० वाजता प्रत्येकजण अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी थांबत नाही'. अनेक सोशल मीडिया युजर्सनी रॅपिडोच्या अधिकृत अकाउंटला टॅग करत सिंधू कुमारी यांचा सन्मान करण्याची मागणी केली आहे.