ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 22:04 IST2025-10-19T22:04:00+5:302025-10-19T22:04:29+5:30
Railway Station Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
Railway Station Viral Video: रेल्वे स्टेशनवर समोसा विकणाऱ्या एका वेंडरने प्रवाशावर दादागिरी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २० रुपयांच्या समोशासाठी वेंडरने प्रवाशाची २ हजार रुपयांची स्मार्टवॉच हिसकावून घेतल्याचे व्हिडिओत दिसते.
नेमकं काय घडलं?
ही घटना १७ ऑक्टोबरच्या संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जबलपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर घडली. एका प्रवाशाने ट्रेनमधून उतरून समोसे घेतले आणि UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रान्झॅक्शन फेल झाले. यादरम्यान, ट्रेन सुटायला लागली, त्यामुळे प्रवाशाने समोसे परत देण्याचा प्रयत्न केला. पण वेंडर एवढा चिडला की, त्याने प्रवाशाचा कॉलर पकडला आणि ओरडला- “टाइम वेस्ट करू नका, पैसे दे.”
Shameful incident at Jabalpur , Railway Station
— Honest Cricket Lover (@Honest_Cric_fan) October 18, 2025
A passenger asked for samosas, PhonePe failed to pay, and the train started moving. Over this trivial matter, the samosa seller grabbed the passenger's collar, accused him of wasting time, and forced the money/samosa. The passenger… pic.twitter.com/Xr7ZwvEVY2
२० रुपयांच्या समोसासाठी २ हजारांची स्मार्ट वॉच घेतली
ट्रेन सुटण्याच्या भीतीने घाबरलेल्या प्रवाशाने आपली स्मार्टवॉच काढून वेंडरला दिली. वेंडरने त्याला दोन प्लेट समोसे देऊन सोडून दिले. या संपूर्ण घटनेचा ३४ सेकंदांचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, प्रवासी UPI फेल झाल्याचं सांगत असतानाही वेंडर ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी प्रवाशाने २ हजार रुपयांची स्मार्टवॉच देऊन सुटका करून घेतली.
आसपासचे लोक सगळं पाहत होते, काही जण व्हिडिओ शूट करत होते, पण कोणीही हस्तक्षेप केला नाही. या प्रकारानंतर प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे स्टेशनवरील अनधिकृत वेंडर्सबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाने तत्काळ घेतले अॅक्शन
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ कारवाई केली. जबलपूर विभागाचे डीआरएम यांनी X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट करून सांगितले की, “वेंडरची ओळख पटली आहे. त्याला RPF (रेल्वे सुरक्षा दल) ने ताब्यात घेतले असून त्याच्यावर केस दाखल केली आहे. त्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक
नेटिझन्सनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की प्रवासी समोसे घेऊ इच्छित नाही, तरीही वेंडर जबरदस्ती करत आहे.” दुसऱ्याने म्हटलं, “डिजिटल पेमेंटवर एवढा भरोसा नको, जवळ कॅश ठेवावी.”