बाबो! "अपुन लिखेगा नही साला", विद्यार्थ्यावर चढला पुष्पा फिव्हर; चक्क उत्तरपत्रिकेत लिहिला डायलॉग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:00 IST2022-04-06T11:54:31+5:302022-04-06T12:00:31+5:30

Social Viral : एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत चक्क पुष्पा फिल्मचा डायलॉग लिहिला आहे. हे पाहून सर्वच हैराण झाले. अ

pushpa raj apun likehga nahi student wrote dialogue in the answer sheet in 10th examination | बाबो! "अपुन लिखेगा नही साला", विद्यार्थ्यावर चढला पुष्पा फिव्हर; चक्क उत्तरपत्रिकेत लिहिला डायलॉग

बाबो! "अपुन लिखेगा नही साला", विद्यार्थ्यावर चढला पुष्पा फिव्हर; चक्क उत्तरपत्रिकेत लिहिला डायलॉग

नवी दिल्ली - अभ्यास, परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. पण कित्येकदा अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी केली जाते किंवा मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीही लिहिलं जातं. काही विद्यार्थी उत्तर लिहिण्याऐवजी चित्रपटातील गाणी अथवा डायलॉग लिहितात. तर काही जण वाटेल ते लिहितात. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

'पुष्पा' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत कोट्यवधींची कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत चक्क पुष्पा फिल्मचा डायलॉग लिहिला आहे. हे पाहून सर्वच हैराण झाले. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा...पुष्पराज मैं झुकेगा नहीं' हा डायलॉग चांगलाच फेमस झाला. सोशल मीडियावर याचे रिल्स येऊ लागले. पण आता हा डायलॉग रिल्सपुरता मर्यादित राहिला नाही. तर रिअएलिटीतही उतरला आहे. 

एका विद्यार्थ्यावर पुष्पाचा असा फिव्हर चढला की त्याने चक्क आपल्या उत्तरपत्रिकेत हा डायलॉग आपला हटके टच देत लिहिला आहे. सोशल मीडियावर या उत्तरपत्रिकेच्या फोटोची पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यामध्ये 'पुष्पा... पुष्पराज... अपुन लिखेगा नहीं साला' असं लिहिलं आहे. त्याशिवाय दुसरं काहीच लिहिलेलं नाही. या प्रकार नेमका कुठला आहे याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र दहावीच्या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत लिहिल्याचं म्हटलं जात आहे. याआधी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: pushpa raj apun likehga nahi student wrote dialogue in the answer sheet in 10th examination