नदीत किनारी पाण्यात मस्त एन्जॉय करत होते लोक, अचानक आला एक मोठा साप आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:55 IST2022-05-26T17:53:23+5:302022-05-26T17:55:14+5:30
Viral Video : यात काही लोक पाण्यात एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नदीचं पाणी फारच स्वच्छ आहे. काही लोक त्यात आहेत.

नदीत किनारी पाण्यात मस्त एन्जॉय करत होते लोक, अचानक आला एक मोठा साप आणि....
Viral Video : उन्हाळा सुरू होताच बरेच लोक पाण्यात पोहण्याचा आनंद घेतात. मग पूल असो की समुद्र किंवा नदी. लोक थंड पाण्यात एन्जॉय करण्याची संधी सोडत नाहीत. बरेच लोक उन्हाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा आनंद घेण्यासाठी पोहोचतात. अनेकजण तर फॅमिलीसोबतच जातात. अशावेळी वेगवेगळया विचित्र घटनाही घडतात. अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यात काही लोक पाण्यात एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नदीचं पाणी फारच स्वच्छ आहे. काही लोक त्यात आहेत. अशात अचानक एक साप पाण्यात येतो आणि एका तरूणाच्या मागे लागतो. तरूण सापाला बघून घाबरतो आणि खिशातून मोबाइल काढत त्याचा व्हिडीओ बनवू लागतो.
तरूण घाबरून नदीबाहेर जातो आणि आपली चप्पलची उचलतो. तो एका दगडावर जाऊन उभा राहतो. तिथून तो सापाचा व्हिडीओ रेकॉर्ड करतो. काही सेकंदाचा हा व्हिडीओ मनात धडकी भरवणाराच आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ wildistic नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत. काही लोकांनी सापावर तर काही लोकांनी तरूणावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तरूण सोडून पाण्यातील इतर लोक अजिबात न घाबरता पाण्यातच बसून आहेत.