VIDEO: प्लेनमध्ये ट्रेनचा अनुभव; 'या' प्रवाशांनी विमानाची पार लोकल केली राव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 19:58 IST2021-10-14T19:55:46+5:302021-10-14T19:58:13+5:30
तुम्ही विमानात लोकल ट्रेन प्रमाणे कल्ला झाल्याचं ऐकलंय का?विमानात प्रवास करणारे प्रवासी हे सोफिस्टिकेटेड समजले जातात. त्यामुळे ना विमानात कुठला आवाज असतो, ना कुणी मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलतं. पण, भारतीयांना याबाबतीत तोड नाही. असाच एक व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय प्रवासी चक्क विमानात गाणी गात आहेत.

VIDEO: प्लेनमध्ये ट्रेनचा अनुभव; 'या' प्रवाशांनी विमानाची पार लोकल केली राव!
मुंबई लोकल काही अटींनिशी सामान्यांसाठी सुरु झाल्या आहेत. लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांना जर सर्वात जास्त कुठल्या गोष्टीची आठवण येत असेल तर ती म्हणजे लोकलची गर्दी, गजबजाट, जागे वरुन होणारी भांडण आणि प्रवासी गात असलेली गाणी. काही वेळा लोकलच्या डब्यांमध्ये भजनाचेही सुर ऐकायला मिळतात. पण तुम्ही विमानात लोकल ट्रेन प्रमाणे कल्ला झाल्याचं ऐकलंय का?
विमानात प्रवास करणारे प्रवासी हे सोफिस्टिकेटेड समजले जातात. सुटाबुटातील हे प्रवास आपला आब राखुनच प्रवास करत असतात. त्यामुळे ना विमानात कुठला आवाज असतो, ना कुणी मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलतं. पण, भारतीयांना याबाबतीत तोड नाही. असाच एक व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय प्रवासी चक्क विमानात गाणी गात आहेत.
मुंबई लोकलसारखाच काहीसा प्रसंग विमानात घडला, इथं एका महिलेने फ्लाईटमध्ये गाणं म्हणत प्रवाशांचं मनोरंजन केलं. बॉलीवूडचं जुनं गाणं ‘सज रही गली तेरी अम्मा’ हे गाणं तिनं गायलं. दिग्गज अभिनेते मेहमूद यांच्या 'कुंवारा बाप' या चित्रपटातील हे गाणं आहे. महिलेने गाणे सुरू करताच जवळ उभे असलेले लोक टाळ्या वाजवू लागले. व्हिडीओ पाहून असे वाटेल की जणू ते फ्लाइट नसून लोकल ट्रेन आहे.
काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून लोक अनेक कमेंट्स करत आहेत. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. मोहम्मद मगदी नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पंजाबला जाणाऱ्या फ्लाइट्स नेहमी अशा असतात’.