'गल्ल्यात १०-२० तर राहू दे भाऊ', पाकिस्तानी चोराचा व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 12:47 IST2021-05-26T12:46:46+5:302021-05-26T12:47:07+5:30

मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ पाकिस्तानातील आहे. यात चोरांनी असं काही केलं की, व्हिडीओ बघून लोक पोट धरून हसू लागले आहेत.

Pakistan funny video of thief going viral | 'गल्ल्यात १०-२० तर राहू दे भाऊ', पाकिस्तानी चोराचा व्हिडीओ झाला व्हायरल

'गल्ल्यात १०-२० तर राहू दे भाऊ', पाकिस्तानी चोराचा व्हिडीओ झाला व्हायरल

घरात किंवा कुठेही चोर आला तर माणसाला भीती वाटतेच. उगाच काही भलंतच होऊ नये असा विचार सतत मनात येत असतो. पण दुसरीकडे चोरी करणारी व्यक्तीही घाबरलेली असते आणि ज्याच्याकडे चोरी होत आहे तोही घाबरलेला असतो. सध्या एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ पाकिस्तानातील आहे. यात चोरांनी असं काही केलं की, व्हिडीओ बघून लोक पोट धरून हसू लागले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यात तुम्ही बघू शकता की, दुकानदार चोराला म्हणतो की, भाई गल्ल्यात १०-२० तर राहू दे. त्यावर चोर साहेब म्हणतात की, हो १०-२० राहू दे. जेव्हा चोर विचारतो की, या आणखी पैसा कुठे आहे. तर दुकानदार सांगतो की, आपल्याकडे कामच येत नाही. मजबुरीत हे करत आहे.

इतकंच काय तर दुकानदार चोरांना असंही म्हणताना ऐकायला येतं की, पुन्हा येऊ नको यार. तर चोर म्हणतो की, इंशाल्लाह पुन्हा नाही येणार.

सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. लोक हा व्हिडीओ बघून पोट धरून हसत आहेत. आणि व्हिडीओही शेअर करत आहेत. त्यावर मजेदार कमेंटही करत आहेत.
 

 

Web Title: Pakistan funny video of thief going viral