Optical Illusion: कुत्र्यांमध्ये लपलाय वाघ, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा, 90 टक्के लोक दमले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 20:08 IST2023-01-02T20:06:38+5:302023-01-02T20:08:01+5:30
Optical Illusion: चला पाहुयात तुम्हाला तुमची नजर किती तीक्ष्ण आहे.

Optical Illusion: कुत्र्यांमध्ये लपलाय वाघ, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा, 90 टक्के लोक दमले...
Optical illusion: आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो/कोडी चांगलीच पसंत केली जातात. या फोटोद्वारे लोक स्वतःची बुद्दी आणि नजर किती तीक्ष्ण आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा फोटोंमध्ये लपलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांचं डोकं चक्रावून गेलंय.
कुत्र्यांच्या टोळीत लपलाय वाघ
सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोत कुत्र्यांची टोळी दिसत आहे. विशेष म्हणजे, या कुत्र्यांमध्ये एक वाघही लपलाय, तोच वाघ तुम्हाला शोधून दाखवायचा आहे. तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास असेल, तर अवघ्या काही सेकंदात तुम्हाला तो वाघ शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केलाय, पण काही सेकंदात हा वाघ शोधता आला नाहीये.
तुम्ही खूप प्रयत्न करुनही तुम्हाला वाघ दिसत नसेल, तर निराश होऊ नका. आतापर्यंत अनेकांनी वाघ शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केलाय. चला तर मग, आम्हीच तुम्हाला वाघ कुठंय, ते सांगू. तर, कुत्र्यांच्या टोळीत वरच्या कोपऱ्यात असलेल्या झाडांमध्ये हा वाघ लपलेला आहे. आतापर्यंत 90 टक्के लोक हा वाघ शोधण्यात अपयशी झाले आहेत. पण, तुम्ही हा वाघ अवघ्या पाच सेकंदात शोधला असेल, तर तुमची नजर अतिशय तीक्ष्ण असल्याचे समजा.