सायकल चालवत असलेल्या मुलाच्या फोटोत आहेत ३ फरक, दोन तर लगेच दिसतील तिसरा मात्र अवघड असेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:24 IST2026-01-01T16:18:59+5:302026-01-01T16:24:31+5:30
Optical Illusion : एक मुलगा सायकल चालवत जात असल्याचं हे चित्र आहे. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. त्यासाठी आपल्याकडे केवळ १९ सेकंदाची वेळ आहे.

सायकल चालवत असलेल्या मुलाच्या फोटोत आहेत ३ फरक, दोन तर लगेच दिसतील तिसरा मात्र अवघड असेल!
Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. हे करत असताना आपली फोकस करण्याची क्षमता वाढते, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचाही व्यायाम होतो. या फोटोत आपल्याला एकसारखे दोन फोटो दिसत आहेत. एक मुलगा सायकल चालवत जात असल्याचं हे चित्र आहे. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. त्यासाठी आपल्याकडे केवळ १९ सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील गोष्टी शोधणं काही सोपं काम नसतं. कारण यांमध्ये गोष्टी अशा पद्धतीने लपवलेल्या असतात की, त्या समोरच असतात पण सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी आपल्याला फोटो खूप बारकाईने बघावा लागतो. तेव्हा आपण त्यातील गोष्टी शोधू शकता. कधी कधी तर अनेक प्रयत्न करूनही उत्तर देता येत नाही. ते म्हणतात ना मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. हेही तसंच आहे.

पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे आपण ते बघत असताना कन्फ्यूज होतो. पण अशा पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजनची आणखी एक खासियत म्हणजे यांच्या माध्यमातून आपली आयक्यू टेस्टही होते. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही सुधारतो. म्हणून हे फोटो खूप लोकप्रिय असतात.

जर आपल्याला या फोटोतील ३ फरक दिसले असतील तर आपलं अभिनंदन. पण जर दिसले नसतील तर निराश होण्याची अजिबात गरज नाहीये. कारण यात कोणते कोणते तीन फरक आहेत, हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत आपण ते फरक बघू शकता.

वरच्या फोटोत ३ फरक सर्कल केलेले आहेत. फरक इतकी बारीक आहेत की, ते सहजपणे शोधणं जरा अवघडच काम आहे.