फोटोत दोन सिंह पाणी पिताहेत, दोन जंगलात लपलेत...लपलेल्यांना ५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:49 IST2026-01-09T15:46:02+5:302026-01-09T15:49:07+5:30
Optical Illusion : आम्ही आपल्यासाठी एक खास ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला दोन लपलेले सिंह शोधायचे आहेत. ज्यासाठी आपल्याकडे केवळ ५ सेकंदाची वेळ आहे.

फोटोत दोन सिंह पाणी पिताहेत, दोन जंगलात लपलेत...लपलेल्यांना ५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : काही म्हणा पण ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची आपली एक वेगळीच खासियत असते. आपण जितक्यांदा असे फोटो बघतो, ते पुन्हा पुन्हा बघावे वाटतात. कारण ते वेगवेगळं चॅलेंज घेऊन आपल्यासमोर येत असतात. त्यातच खरी गंमत असते. हे फोटो आपल्याला बुचकळ्यात टाकतात, आपण कन्फ्यूज होतो आणि मग जिद्दीला पेटून यातील गोष्टी शोधायला लागतो. यातून मनोरंजन तर होतंच, सोबतच आपला मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी एक खास ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला दोन लपलेले सिंह शोधायचे आहेत. ज्यासाठी आपल्याकडे केवळ ५ सेकंदाची वेळ आहे.
आपण पाहू शकता की, आपल्यासमोर असलेल्या फोटोत एक जंगल दिसत आहे. जंगलातून वाहणाऱ्या नदीत एक सिंह आणि एक सिंहीण पाणी पित आहे. मागे घटदाट जंगल दिसत आहे. याच जंगलात आणखी दोन सिंह लपलेले आहेत. जे आपल्याला शोधून काढायचे आहेत. तेही फक्त ५ सेकंदात. जर आपले डोळे खरंच तीक्ष्ण असतील तर नक्कीच या वेळेत आपण ते लपलेले सिंह शोधू शकाल.

बरं ऑप्टिकल इल्यूजन फोटोंबाबत सांगायचं तर हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी ते रिअलिस्टिक असतात, तर कधी आर्टिफिशिअल म्हणजे तयार केलेले असतात. कधी त्यांमध्ये प्राणी, तर कधी वस्तू शोधायच्या असतात. यात आपल्याला प्राणी शोधायचे आहेत. जे शोधता शोधता आपली एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता सुद्धा मजबूत होईल आणि आपली आयक्यू टेस्टही होईल.

या फोटोंची आणखी एक चांगली खासियत म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे यातील गोष्टी शोधता शोधता मेंदू आणि डोळ्यांचा व्यायामही होतो. त्यामुळे हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावरील इतर वायफळ फोटोंपेक्षा नक्कीच फायदेशीर आणि मनोरंजनात्मक असतात. कारण यातून दोन्ही गोष्टी होतात, त्या म्हणजे टाइमपास आणि व्यायाम.

चला...आम्हाला आशा आहे की, ५ सेकंदात आपल्याला या फोटोतील जंगलात लपलेले दोन सिंह सापडले असतील. सापडले असतीलच तर आपलं अभिनंदन. जर सापडले नसतील तर निराश होण्याचं देखील काम नाही. कारण ते दोन सिंह कुठे आहेत हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत दोन लपलेले सिंह सर्कल केले आहेत.

वरच्या फोटो दोन लपलेले सिंह सर्कल केलेले बघू शकता.