चॅलेंज! महिलांच्या फोटोत आहे एक एलिअन, जीनिअस लोकच ७ सेकंदात शोधू शकतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:10 IST2024-09-21T14:09:11+5:302024-09-21T14:10:05+5:30
Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला तीन महिला दिसत आहेत. मात्र, यात तीनपैकी एक एलिअन आहे. हा एलिअन शोधण्यासाठी तुमच्याकडे ७ सेकंदाची वेळ आहे.

चॅलेंज! महिलांच्या फोटोत आहे एक एलिअन, जीनिअस लोकच ७ सेकंदात शोधू शकतील!
Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंमधील रहस्य उलगडण्यासाठी लोकांना मजा येते. कारण यात त्यांचा मेंदू आणि डोळ्यांची चांगलीच कसरत होते. याचं कारण यातील गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेल्या असतात की, समोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. असाच एक वेगळा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक एलिअन शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात तर कधी यांमध्ये फरक किंवा रहस्य शोधायचे असतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला तीन महिला दिसत आहेत. मात्र, यात तीनपैकी एक एलिअन आहे. हा एलिअन शोधण्यासाठी तुमच्याकडे ७ सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच आकर्षण ठरत असतात. कारण यातून लोकांचं मनोरंजन तर होतंच, सोबतच त्यांचा मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. इतकंच नाही तर तुमची आयक्यू टेस्टही होते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही लगेच यातील एलिअन शोधू शकाल. फक्त तुम्हाला फोटो थोडा बारकाईने बघावा लागेल.
जर तुम्हाला ७ सेकंदात या फोटोतील एलिअन सापडला असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तीन महिलांमध्ये एलिअन कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.
वरच्या फोटोत एलिअन सर्कल केला आहे. तुम्ही जर बारकाईने बघाल तर लाल ड्रेस घातलेल्या महिलेचं एक बोट हिरव्या रंगाचं आहे. सामान्य मनुष्याच्या बोटाचा रंग हिरवा नसतो.