Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 9 चेहरे, समोरच आहेत पण शोधणं आहे अवघड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 14:39 IST2022-08-15T14:31:12+5:302022-08-15T14:39:34+5:30
Optical Illusion: या फोटोंबाबत मिळालेलं चॅलेंज तेच लोक पूर्ण करू शकतात ज्या लोकांची नजर तीक्ष्ण असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 9 चेहरे, समोरच आहेत पण शोधणं आहे अवघड!
Optical Illusion: सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो बघून जास्तीत जास्त लोकांचं डोकं चक्रावून जातं. ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा अर्थ डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणे. हे फोटो बघून लोक कन्फ्यूज होतात. या फोटोंबाबत मिळालेलं चॅलेंज तेच लोक पूर्ण करू शकतात ज्या लोकांची नजर तीक्ष्ण असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोत झाडं आणि 9 चेहरे लपलेले आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत. यातील 9 चेहरे शोधता शोधता तुमचं डोकं चक्रावून जाईल. पण जर तुम्ही नजर तीक्ष्ण असेल तरच तुम्ही हे चेहरे शोधू शकाल. जर तुम्ही सगळे चेहरे शोधाल तर तुम्ही स्वत:ला जीनिअस म्हणू शकाल.
या फोटोंमध्ये कधी कधी जे आपल्या समोर असतं ते आपल्याला दिसत नाही. या व्हायरल झालेल्या फोटोतही असंच काही आहे. फोटो पाहून तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. भल्याभल्यांच्या नाकी नऊ येतात. पण तुम्ही डोकं शांत ठेवून बघितलं तर तुम्हाला नक्कीच 9 चेहरे दिसतील. हा फोटो दिसायला फारच सामान्य आहे. पण यातील 9 चेहरे शोधणं फार अवघड आहे.
या फोटोतील झाडाच्या फांद्यांमध्ये हे 9 चेहरे लपले आहेत. सामान्यपणे सुरूवातीला 2 ते 3 चेहरे लगेच दिसतात. पण त्यापेक्षा जास्त चेहरे शोधण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल.