डोळे तीक्ष्ण असतील तर शोधून दाखवा या फोटोतील उंदीर, 6 सेकंदाची आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:07 IST2024-04-02T16:04:02+5:302024-04-02T16:07:42+5:30
Optical Illusion: आम्ही जो फोटो आणला आहे त्यात एक सिंह दिसत आहे. पण यात आणखी एक प्राणी आहे ज्याला तुम्हाला शोधायचं आहे.

डोळे तीक्ष्ण असतील तर शोधून दाखवा या फोटोतील उंदीर, 6 सेकंदाची आहे वेळ!
Optical Illusion: सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत करतात. सोबतचच तुमचं चांगलं मनोरंजनही होतं. लहान मुलांची आईयक्यू टेस्ट घेण्यासाठी असे फोटो फार चांगले असतात. कारण यात एकतर काही लपलेलं शोधायचं असतं नाही तर यातील फरक शोधायचे असतात. असाच एका फोटो आम्ही तुमच्यासमोर आणला आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असतात. पण त्या सहजपणे आपल्याला दिसत नाहीत. सोशल मीडियावर बरेच लोक आपला बराच वेळ या फोटोंमधी लपलेल्या गोष्टी शोधण्यात घालवतात. अशात आम्ही जो फोटो आणला आहे त्यात एक सिंह दिसत आहे. पण यात आणखी एक प्राणी आहे ज्याला तुम्हाला शोधायचं आहे.
सिंहासोबत या फोटो कोणताही प्राणी लपला आहे त्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 6 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्हाला अजूनही यातील दुसरा प्राणी दिसला नसेल तर फोटोकडे बारकाईने बघा आणि मग पुन्हा त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. यातील दुसरा प्राणी एक उंदीर आहे. आता तरी तुम्ही शोधू शकता.
जर तुम्हाला यातील उंदीर दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही चांगले आहेत. पण अजूनही जर यातील उंदीर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तो कुठे लपवलाय हे बघू शकता.