एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत आहेत 3 फरक, 12 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:41 IST2025-12-01T17:36:13+5:302025-12-01T17:41:39+5:30
Optical Illusion: आज तुमच्यासाठी एक भन्नाट ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मजा येईल.

एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत आहेत 3 फरक, 12 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन फोटोतील कोडं सोडवणं नेहमीच मजेदार असतं. तुम्ही आधी कधी असे पझल्स सोडवले असतील, तर नक्कीच हे मान्य कराल. आणि जर कधी प्रयत्न केला नसेल, तर आता सुरू करणं मजेदार तर आहेच, सोबतच मेंदूसाठीही फायदेशीर आहे. हे पझल्स मेंदूला रोजच्या सारख्या कामांपासून ब्रेक देतात आणि त्याची चांगली एक्सरसाइज करतात. म्हणूनच आज तुमच्यासाठी एक भन्नाट ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मजा येईल.
आजचं चॅलेंज काय आहे?
ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांचा भ्रम. आपल्याला जे दिसतं ते प्रत्यक्षात तसं नसतं. आजच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला अशीच एक मजेदार गोष्ट करायची आहे. तुमच्यासमोर दोन चित्रे दिली आहेत. पहिल्या नजरेत ती एकसारखी वाटत असली तरी त्यामध्ये तीन फरक लपलेले आहेत. हे तीन फरक 12 सेकंदांमध्ये शोधायचे हा आहे आजचं चॅलेंज!

तुम्ही ते तीन फरक शोधले का?
जर फरक शोधले असतील तर आपलं अभिनंदन. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला मजा आली असेल. पण जर नाही शोधू शकला, तर काही हरकत नाही. चला मग आम्ही मदत करतो. खालच्या फोटोत फरक बघू शकता.

एकसारख्या दिसणाऱ्या फोटोतील 3 फरक वरच्या फोटोत दिले आहेत.