Optical Illusion: महिलेचे खरे डोळे उघडे आहेत की बंद? उत्तर शोधण्यात अनेक धुरंधर फेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:54 IST2026-01-02T14:53:02+5:302026-01-02T14:54:23+5:30
Optical Illusion : एक खास फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात आपल्याला फोटोतील महिलेचे खरे डोळे उघडे आहेत की बंद हे सांगायचं आहे. ज्यासाठी आपल्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion: महिलेचे खरे डोळे उघडे आहेत की बंद? उत्तर शोधण्यात अनेक धुरंधर फेल
Optical Illusion : जवळपास सगळेच ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे खास आणि आपल्याला कन्फ्यूज करणारे असतात. या फोटोंचा मुख्य उद्देश आपलं मनोरंजन करणं असतो. पण सोबतच यांच्या माध्यमातून आपल्या मेंदूची आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी मेंदू आणि डोळे दोन्ही गोष्टींची मदत लागते. यातील गोष्टी शोधण्यात एक मजाही येते. कारण त्यात जे लपवलं आहे किंवा लपलं आहे ते सहजपणे दिसत नाही. असाच एक खास फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात आपल्याला फोटोतील महिलेचे खरे डोळे उघडे आहेत की बंद हे सांगायचं आहे. ज्यासाठी आपल्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे.
इन्स्टाग्रामवर हा फोटो @mimles नावाच्या हॅंडलवर शेअर करण्यात आला होता. तसा हा फोटो जुना आहे. पण बऱ्याच लोकांनी पाहिला नसेल. याच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, 'मी माझी बाल्ड कॅप आणि इल्यूजनसोबत तिनदा झोपले. कारण माझ्या डोक्याच्या एका बाजूला पेंटिंग केल्याने मला खूप चक्कर येत होती. हे बनवण्यासाठी साधारण ८ तास वेळ लागला. मला माझं जुनं मल्टीपल-फीचर इल्यूजन पुन्हा बनवायचं होतं. जेणेकरून बघता येईल की मी किती विकसीत झाली आहे'.
यूजर्सच्या कमेंट्स
हा फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. एका यूजरने लिहिलं की, मला पूर्ण विश्वास आहे की, जेव्हा आपण चित्र काढणं किंवा फोटो काढणं चांगलं जाणतो, तेव्हा आपण हे करू शकतो. पण ही कलाकारी वेगळ्या लेव्हलची आहे. एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की, अद्भुत मेकअप आहे. अशाच कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.
खरे डोळे बंद आहेत की उघडे?
हे ऑप्टिकल इल्यूजन पाहून अनेकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. लोकांची उत्तरं वेगवेगळी होती. बऱ्याच लोकांनी चुकीचं उत्तर दिलं. काही यूजर्स म्हणाले की, या फोटोतील महिलेचे डोळे बंद आहेत. सोशल मीडियावर या फोटोवर बरीच चर्चा रंगली. ज्यात बरेच लोक महिलेचे डोळे बंद आहेत, यात मतावर सहमत असल्याचे दिसले.