95 टक्के लोक 5 च्या गर्दीत लपलेला 6 नंबर शोधण्यात फेल, आपणही एकदा ट्राय करा; डोळ्यांचीही होईल टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:17 IST2026-01-05T16:07:22+5:302026-01-05T16:17:44+5:30
Optical Illusion : आपणही बरेच दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व्ह केला नसेल तर काळजी करू नका. कारण आम्ही आपल्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत.

95 टक्के लोक 5 च्या गर्दीत लपलेला 6 नंबर शोधण्यात फेल, आपणही एकदा ट्राय करा; डोळ्यांचीही होईल टेस्ट
Optical Illusion : आपण अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे म्हणजे कन्फ्यूजन करणारे किंवा डोकं चक्रावून सोडणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो कधीना कधी पाहिले असतीलच. इतकंच नाही तर त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न देखील केला असेल आणि कधी त्यात यशही मिळालं असेलच. आनंदही झाला असेल. हे फोटो फारच इंटरेस्टींग असतात. त्यामुळेच पुन्हा पुन्हा यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज स्वीकारावं वाटतं.
आपणही बरेच दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व्ह केला नसेल तर काळजी करू नका. कारण आम्ही आपल्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला 5 नंबरच्या गर्दीत लपलेला 6 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी आपल्याकडे 20 सेकंद आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे एखाद्या आव्हानासारखेच असतात. म्हणजे यातील गोष्टी किंवा नंबर दिसले नाही तर चिड येते. मग आपण आणखी बारकाईने फोटो बघत त्यातील गोष्टी शोधतो. जर दिसल्या तर मोठा आनंदही होतो. गंमत म्हणजे हे फोटो एकाच प्रकारचे नसतात. त्यातही विविध प्रकार असतात.

काहींमध्ये आपल्याला वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात, तर कधी त्यांमध्ये वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. या फोटोत आपल्याला वेगळा नंबर शोधायचा आहे. आपल्याला यात सगळीकडे 5 हा नंबर दिसत असेल. जे बघून डोकं सु्द्धा गरगरलं असेल. हीच या फोटोची खरी गंमत आहे. 5 गर्दीत 6 हा नंबर लपवण्यात आला आहे. जो आपण शोधून काढायचाय.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सायकॉलॉजीकली खूप फायदेशीर असतात. कारण या फोटोतील गोष्टी शोधता शोधता आपले डोळे आणि मेंदू दोन्हींचा चांगला व्यायाम होतो. फोकस करण्याची आपली क्षमता सुधारते. सोबतच मनोरंजन होतं आणि आयक्यू टेस्टही होते. त्यामुळेच असे फोटो लहानांसोबतच मोठ्यांमध्ये सुद्धा लोकप्रिय ठरतात. पण या फोटोंमधील गोष्टी शोधणं इतकंही सोपं किंवा खायचं काम नाही. बरीच मेहनत घ्यावी लागते. तेव्हाच ठरलेल्या वेळेत आपल्याला हवं ते दिसतं.

जर आपल्याला या फोटोतील वेगळा म्हणजेच 6 हा नंबर दिसला असेल तर आपलं मनापासून अभिनंदन. मात्र, अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही आपली मदत करणार आहोत. खालच्या फोटोत आपण यातील वेगळा नंबर बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केला आहे.