चॅलेंज! फोटोतील 218 हा नंबर शोधा आणि जीनिअस ठरा, बरेचजण शोधून शोधून थकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:23 IST2025-05-19T12:53:43+5:302025-05-19T13:23:14+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

चॅलेंज! फोटोतील 218 हा नंबर शोधा आणि जीनिअस ठरा, बरेचजण शोधून शोधून थकले...
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कारण हे फोटो मनोरंजन करण्यासाठी आणि डोळे व मेंदुची एक्सरसाईज करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. या फोटोंमध्ये कधी लपलेल्या गोष्टी तर काहींमध्ये लपलेले प्राणी शोधायचे असतात. तर कधी कधी यातील फरक शोधायचे असतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला 218 हा नंबर शोधायचा आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 287 नंबरच्या काही लाइन्स दिसत आहेत. पण यात एक 218 नंबर आहे. जो तुम्हाला 5 सेकंदात शोधायचा आहे. ही खरंतर तुमची आणि तुमच्या डोळ्यांची परीक्षा ठरणार आहे. कारण हे काम काही सोपं नाही. ठरलेल्या वेळेत हा नंबर शोधणं एक चॅलेंज आहे. पण हेही तितकंच खरं आहे की, याने तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे असं की, तुमच्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टीच तुम्हाला दिसत नाहीत. त्या तुम्हाला शोधाव्या लागतात. तेच यातही करायचं आहे. आता खूप एकसारख्या गोष्टी समोर आल्यावर त्यातून वेगळी गोष्ट किंवा नंबर शोधणं जरा अवघड आहे. पण प्रयत्न कराल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
आम्हाला आशा आहे की, तुम्ही या फोटोतील 218 हा नंबर शोधला असेलच. जर शोधला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील नंबर सापडला नसेल तर निराश होऊ नका. नंबर कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.
वरच्या फोटोत तुम्ही फोटोतील वेगळा नंबर बघू शकता.