जीनिअस असाल तर शोधून दाखवा फोटोतील 'DOVE' शब्द, २० सेकंदाची आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:58 IST2024-06-27T15:55:45+5:302024-06-27T15:58:06+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला DOVE हा इंग्रजी शब्द शोधायचा आहे. या फोटोत सगळेच एकसारखे दिसणारे शब्द आहेत.

जीनिअस असाल तर शोधून दाखवा फोटोतील 'DOVE' शब्द, २० सेकंदाची आहे वेळ!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी यांमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील फरक शोधायचा असतो. तर कधी या फोटोंमधील वेगळा शब्द शोधायचा असतो. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. हे चॅलेंज चांगलंच मजेदार आणि तुम्हाला मेहनत करायला लावणारं आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. सोबतच हे फोटो मेंदू आणि डोळ्यांची चांगली करसतही करतात. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनतही घ्यावी लागते. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला DOVE हा इंग्रजी शब्द शोधायचा आहे. या फोटोत सगळेच एकसारखे दिसणारे शब्द आहेत. पण यात एक वेगळा शब्द आहे तो म्हणजे DOVE.
असे एकसारखे नंबर किंवा शब्द दिसणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर जास्त कन्फ्यूजन करतात. कारण यात वेगळा शब्द शोधणं अवघड काम असतं. सगळं एकसारखं दिसत असतं. पण यातच तर खरी गंमत आहे. तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील वेगळा शब्द शोधू शकाल.
या फोटोतील वेगळा शब्द शोधण्यासाठी तुमच्याकडे २० सेकंदाची वेळ आहे. जर या वेळेत तुम्ही वेगळा शब्द शोधू शकले तर तुम्ही जीनिअस ठराल. जर वेळेत शब्द सापडला नाही तर निराशही होऊ नका. कारण हा एक गेम आहे. यातील वेगळा म्हणजे DOVE शब्द शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही हा शब्द बघू शकता.
फोटोत तुम्हाला सगळेच शब्द DOVE असल्याचा भास होत असेल. पण मुळात त्या शब्दांमध्ये O नाही तर 0 आहे. त्यामुळे सगळेच DOVE वाटतात पण ते नाहीत.