Viral Video : झोपलेल्या वाघाजवळ जाऊन ओरडू लागले मोर, संतापलेल्या वाघाने केलं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:24 IST2021-07-20T15:20:22+5:302021-07-20T15:24:29+5:30
Social Viral : व्हायरल व्हिडीओत मोर चुकून जवळच झोपलेल्या वाघाची झोप मोड करतात. झोप उडाल्यावर वाघ चांगलाच चिडतो आणि तो अचानक रागात मोरावर हल्ला करतो.

Viral Video : झोपलेल्या वाघाजवळ जाऊन ओरडू लागले मोर, संतापलेल्या वाघाने केलं असं काही....
प्राण्यांचे अनेक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण कधी दोन वेगवेगळ्या साम्राज्याचे मालक आपसात भिडल्याचं तुम्ही पाहिलंय का? नाही ना? भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय प्राणी वाघ यांच्यातील भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. भारतातील दोन राष्ट्रीय प्रतीक असलेले वाघ आणि मोराचा (Tiger and Peacock Video) आमना-सामना झाला.
व्हायरल व्हिडीओत मोर चुकून जवळच झोपलेल्या वाघाची झोप मोड करतात. झोप उडाल्यावर वाघ चांगलाच चिडतो आणि तो अचानक रागात मोरावर हल्ला करतो. वाघाला त्याच्या गाढ झोपेतून उठवून आजूबाजूला फिरत असलेल्या मोराला याचा जराही अंदाज नसेल की त्याच्यावर हल्ला होणार आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. (हे पण वाचा : खतरनाक VIDEO! रस्त्यात चालताना झाडीत वाघ दिसला; तरुण वाघोबाला 'हॅलो ब्रदर' म्हणाला, अन् मग...)
जसा वाघ हल्ला करण्यासाठी धावतो मोर आपला पिसारा फुलवून तेथून पसार होतो. या व्हायरल व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. काही यूजर्सनी मोराच्या नशीबावर आश्चर्य व्यक्त केलं. हा व्हिडीओ इंडियन बीकीपर्स यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ९० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.