भाडेकरुने घराची अशी काही लावली वाट, खर्च पाहून घरमालक गेला 'कोमात'...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 12:05 PM2019-11-12T12:05:15+5:302019-11-12T12:17:55+5:30

इतकेच काय तर घराची अशी स्थिती झाली आहे की, घर दुरूस्त करण्यासाठी डेव्हिडला लाखो रूपये खर्च येऊ शकतो.

OMG! Landlord faces 30000 bill tenants left property in Britain | भाडेकरुने घराची अशी काही लावली वाट, खर्च पाहून घरमालक गेला 'कोमात'...

भाडेकरुने घराची अशी काही लावली वाट, खर्च पाहून घरमालक गेला 'कोमात'...

Next

डेव्हिड राइटने त्याचं चार बेडरूमचं घर भाड्याने दिलं होतं. पण भाडेकरू घराची अशी अवस्था करून गेले की, डेव्हिड हैराण झाला आहे. इतकेच काय तर घराची अशी स्थिती झाली आहे की, घर दुरूस्त करण्यासाठी डेव्हिडला लाखो रूपये खर्च येऊ शकतो. हे काय कमी होतं की, भाडेकरूने डेव्हिडचे २३ लाख रूपये थकवून पोबारा केला. आता घराची स्थिती चांगली करण्यासाठी डेव्हिडला साधारण १ ते दीड लाख रूपये खर्च येऊ शकतो.

ही घटना आहे ब्रिटनची. डेव्हिड घरी आला तेव्हा घरात सगळीकडे पसारा पडलेला होता. किचनची स्थिती फारच वाईट होती. कारपेट फाटलेलं होतं. अर्धे खाल्लेले पदार्थ इकडे-तिकडे फेकलेले होते.

तर बाथरूमची अवस्था अशी होती की, तिथं उभं राहणंही कठीण होत होतं.

हे सगळं इतक्यावरच थांबत नाही. भाडेकरूने घरातील विजेच्या वायर्सची फिटिंगही काढली होती. फर्निचरही काढण्यात आलं होतं.

डेव्हिडनुसार, घराची स्थिती अशी झाली होती की, हे व्यवस्थित करण्यासाठी डेव्हिडला साधारण १ लाख ५७ हजार खर्च येणार होता. धक्कादायक बाब म्हणजे भाडेकरू डेव्हिडला द्यावे लागणारे २३ लाख रूपयेही न देताच गेला.

डेव्हिड म्हणाला की, त्याला आधीच माहिती होतं की, या भाडेकरूंकडून पैसे मिळणार नव्हते. पण तो तरिही शांत होता. आता त्याला हे घर व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर हे घर विकायचं आहे.

LegalforLandlords नावाची एक संस्था आहे. तेच डेव्हिडचं हे प्रकरण समोर घेऊन आले आहेत. त्यांनीच सोशल मीडियात फोटो शेअर केलेत. जेणेकरून इतर घरमालक सावध होतील. 


Web Title: OMG! Landlord faces 30000 bill tenants left property in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.