हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:38 IST2026-04-03T11:37:59+5:302026-04-03T11:38:46+5:30

Vrundavan Video Viral News: तुम्हालाही असा अनुभव कधी आलाय का?

oh my god a lady bought a yantra for rs 501 from vrindavan worshipped it in a home for 10 years now she shocked when opened it after see the reel | हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!

हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!

Vrundavan Video Viral News:सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. परंतु, व्हायरल झालेल्या गोष्टीतून धडा घेणारेही अनेक जण आहेत. एखाद्या व्हायरल व्हिडिओमुळे आपल्या बाबतही असेच घडले आहे, अशी भावना मनात येणारेही अनेक जण आहेत. असाच एक अनुभव एका महिलेला आला आहे. एक व्हायरल रील पाहून एका महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आहे. त्याचा व्हिडिओ करून त्या महिलेने सोशल मीडियावर टाकला. सदर महिलेने टाकलेला व्हिडिओच आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेमके काय घडले, ते पाहुया...

वृंदावन येथे जाणाऱ्या भाविक पर्यटकांची संख्या मोठी आहे. श्रीकृष्णाच्या चरणी लीन होऊन कृपा लाभण्याची आस धरणारे भाविक कोट्यवधींच्या घरात आहेत. वृंदावनाची महती, महात्म्य आणि महत्त्वही वेगळे आहे. परंतु, देवाच्या दारात जावे आणि आपलीच फसवणूक व्हावी, ही गोष्ट अधिक मनाला लागते. फसवणुकीचा स्तर कोणत्या थराला जाऊन पोहोचला आहे, याचे हे उदाहरण आहे. स्कॅम करणाऱ्यांनी मंदिरे, तीर्थस्थळेही सोडली नाहीत, अशीच भावना व्यक्त केली जात आहे. रंजना यादव नावाच्या एका महिलेने १०-१२ वर्षांनंतर मथुरा-वृंदावनमध्ये तिच्यासोबत घडलेल्या एका 'फसवणुकी'बद्दल सोशल मीडियावर खुलासा केला आहे. आतापर्यंत या फसवणुकीबद्दल पुसटशी कल्पनाही नव्हती. परंतु, एका रीलने डोळे खाडकन उघडले. 

एका बाबाने तिला ५०१ रुपयांना एक 'यंत्र' विकले

रंजना यादव यांनी झालेल्या फसवणुकीचा घटनाक्रम एका व्हिडिओतून सांगितला आहे. रंजना व्हिडिओमध्ये सांगतात की, ती १०-१२ वर्षांपूर्वी मथुरा-वृंदावनला गेली होती, जिथे एका बाबाने तिला ५०१ रुपयांना एक 'यंत्र' विकले. आपण तीर्थस्थळी जातो, तेव्हा तेथील आठवण किंवा अशी एखादी वस्तू विकत घेतो की, त्यातून चांगले घडण्याची मनीषा व्यक्त करतो. रंजनानेही वृंदावन येथून असेच एक यंत्र आणले होते आणि ते देवघरात ठेवले. त्यानंतर आता १०-१२ वर्षांनंतर इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहून, त्यांनही त्यांच्या देवघरात आणून ठेवलेले यंत्र उघडण्याची उत्सुकता निर्माण झाली. रंजना यांनी सुताने बांधलेला कागद उघडण्यास सुरुवात केली. 

कागदात यंत्र वगैरे काहीच नव्हते

काही कागदांची एक पुडी करून त्यावर एक रुपयाचे नाणे चिकटवून या सगळ्या गोष्टी एका दौऱ्यात बांधल्या होत्या. पुडीभोवती गुंडाळलेला दोरा रंजना यांनी कापला. त्याला चिकटवलेला एक रुपया बाजूला केला आणि पुडी उघडायला सुरुवात केली. तथाकथित 'यंत्र' उघडायला सुरुवात केल्यावर आतमध्ये द्रोणाच्या आकारात केवळ प्लास्टिकची वाटी आढळून आली. हे पाहिल्यावर रंजना यांना मोठाच धक्का बसला. याचा अर्थ असा की, ५०१ रुपयांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात फक्त १ रुपया मिळाला आहे.

पैसे कमावण्यासाठी माणूस काय-काय बनवू शकतो?

पैसे कमावण्यासाठी माणूस काय-काय बनू शकतो? गेल्या १० वर्षांत त्यासाठी काय-काय करावे लागले असेल याचा मी विचारही केलेला नाही. त्यामुळे, जेव्हा कधी तुम्ही वृंदावनला जाल, तेव्हा बाबा लोकांकडून अशा प्रकारची कोणतीही वस्तू विकत घेण्याची गरज नाही. ऑनलाइन व्हायरल झालेल्या या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, रंजना यांचा व्हिडिओ अवघ्या दोन दिवसांत ९४४,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. ३१,००० वापरकर्त्यांनी तो लाईक केला असून, त्यावर ४,५०० हून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. कमेंट्समध्ये, बहुतेक वापरकर्त्यांनी प्रमुख धार्मिक स्थळांवर खरेदी करताना नेहमी सावधगिरी बाळगण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. 


Web Title : महिला के 'पवित्र उपकरण' का दस साल बाद प्लास्टिक घोटाला निकला।

Web Summary : एक महिला को एक रील देखने के बाद पता चला कि उसके साथ दस साल पहले वृंदावन में घोटाला हुआ था। उसने ₹501 में एक 'यंत्र' खरीदा, उसे अपने मंदिर में रखा, लेकिन उसमें सिर्फ एक प्लास्टिक का कटोरा था। वीडियो वायरल हो गया, जिससे तीर्थयात्रियों को ऐसे घोटालों के खिलाफ चेतावनी दी गई।

Web Title : Woman's decade-long 'holy device' purchase revealed as plastic scam.

Web Summary : A woman discovered she was scammed in Vrindavan ten years ago after seeing a reel. She bought a 'yantra' for ₹501, kept it in her shrine, but it contained only a plastic bowl. The video went viral, cautioning pilgrims against such scams.