Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:49 IST2025-07-07T17:48:33+5:302025-07-07T17:49:52+5:30
मुलांनी रेल्वे ट्रॅकवर धोकादायक स्टंट केला आणि त्याचा व्हिडीओ बनवला.

Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
ओडिशामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरपीएफने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या मुलांनी रेल्वे ट्रॅकवर धोकादायक स्टंट केला आणि त्याचा व्हिडीओ बनवला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. व्हिडिओमध्ये १२ वर्षांचा मुलगा तालुपालीजवळ रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी झोपलेला दिसत आहे. ट्रेन त्याच्यावरून जाते.
रीलसाठी मुलांनी हा भयंकर प्रकार केला आहे. २९ जून रोजी एक १२ वर्षांच्या मुलगा ट्रॅकवर झोपून राहिला. त्याच्या १५ वर्षांच्या मित्राने या स्टंटचा व्हिडीओ बनवला. आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये ट्रॅकजवळ आणखी एक अल्पवयीन मुलगा उभा असल्याचं दिसत आहे. परंतु तो स्टंटमध्ये सहभागी नव्हता.
రీల్స్ కోసం ప్రాణాలతో చెలగాటం
— Telugu Scribe (@TeluguScribe) July 6, 2025
ఒడిశా – బౌద్ జిల్లాలోని పూరునాపానీలో రీల్స్ పిచ్చిలో ట్రైన్ పట్టాల మధ్య పడుకున్న బాలుడు
దానిని ఫోన్లో వీడియో తీసిన బాలుడి స్నేహితులు
ముగ్గురు మైనర్లను అదుపులోకి తీసుకొని విచారిస్తున్న అధికారులు pic.twitter.com/tf7N5I5kVo
या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. RPF इन्स्पेक्टर म्हणाले की, हे अत्यंत धोकादायक होतं, ज्यामुळे जीवही जाऊ शकतो. व्हिडिओ मिळाल्यानंतर, आम्ही ताबडतोब तपास सुरू केला आणि गावात पोहोचलो. अल्पवयीन मुलांचं आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन केलं. अशा स्टंटच्या धोक्यांबद्दल लोकांना सांगण्यासाठी आम्ही जागरूकता मोहीम देखील सुरू केली आहे. '
रेल्वेने लोकांना, विशेषतः तरुणांना, रेल्वे ट्रॅकवर धोकादायक स्टंट करू नयेत असं आवाहन केलं आहे. बौध जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी हा स्टंट करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जून रोजी बौध आणि पुरनाकटका स्थानकांना जोडणाऱ्या दोन नवीन ट्रेनचं उद्घाटन केलं होतं. स्टंटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.