Viral Video: बॉलीवुडने परदेशी डान्सर्सनाही लावलं वेड, नॉर्वेचे तरुण थिरकले 'चुरा के दिल मेरा' गाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 22:06 IST2022-06-22T21:59:23+5:302022-06-22T22:06:45+5:30
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ समोर येतात, जे नेटकऱ्यांचा खूप पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरमध्ये चर्चेत आहे. ज्यामध्ये एक परदेशी डान्स ग्रुप भारतीय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Viral Video: बॉलीवुडने परदेशी डान्सर्सनाही लावलं वेड, नॉर्वेचे तरुण थिरकले 'चुरा के दिल मेरा' गाण्यावर
बॉलिवूडच्या गाण्यांचे जगभरात फॅन्स आहेत. बॉलिवूड गाण्यांवर भारतीय असो वा परदेशी कुणीही थिरकल्याशिवाय शांत बसू शकत नाही. बॉलीवुडची गाणी लागली की पाय आपोआप ठेका धरायला सुरुवात करतात.अनेक वेळी परदेशी लोक बॉलिवूड गाण्यांची मजा घेत त्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ समोर येतात, जे नेटकऱ्यांचा खूप पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरमध्ये चर्चेत आहे. ज्यामध्ये एक परदेशी डान्स ग्रुप भारतीय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला दिसेल की हा लग्नाच्या रिसेप्शनमधील व्हिडीओ आहे. यामध्ये नॉर्वेचा एक डान्स ग्रुप त्यांच्या अप्रतिम डान्स मूव्हज दाखवत आहे. बॉलिवूड गाण्यावरील त्याचा डान्स पाहून त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. त्याच्या डान्स स्टेप्सचं सर्वांनाच वेड लागलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये, डान्स ग्रुपमधील सर्व लोक सूट-बूट घातलेले आहेत. 'चुरा के दिल मेरा' या गाण्यावर ते अगदी बॉलीवुड स्टाईलमध्ये थिरकतायत.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 80 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. शिवाय लोक या व्हिडीओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत