नोरापेक्षाही खतरनाक डान्सिंग मुव्ह्स! खुद्द नोरो फतेहीने शेअर केला व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 17:32 IST2021-11-15T17:29:41+5:302021-11-15T17:32:12+5:30
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. नोराने हा व्हिडिओ का शेअर केला आहे याचे उत्तर फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरच मिळेल...

नोरापेक्षाही खतरनाक डान्सिंग मुव्ह्स! खुद्द नोरो फतेहीने शेअर केला व्हिडिओ...
नोरा फतेहीने कुसु कुसू गाणे रिलीज झाल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. नोराने हा व्हिडिओ का शेअर केला आहे याचे उत्तर फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरच मिळेल...
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘सत्यमेव जयते 2’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘कुसु कुसू’ गाण्यावर तीन मुली नाचताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे या तिन्ही मुली झोपडपट्टीसमोर नाचताना दिसतील. त्यांचा डान्स पाहिल्यानंतर प्रत्येकजण म्हणेल की त्यांच्यात टॅलेंट भरलेले आहे.
नोराने शेअर केलेल्या या व्हिडीओचे यूजर्सनी कौतुक केले. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘ओएमजी, हे खूप सुंदर आहे! तुम्ही लोक आश्चर्यकारक आहात! याशिवाय व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक इमोजीही दिसत आहेत. ‘कुसु कुसू’ हे गाणे ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटातील एक आयटम साँग आहे, ज्यामध्ये नोरा फतेही जोरदारपणे थिरकते. नोराच्या डान्स मूव्हज खूप किलर आहेत, जे पाहून सर्वजण तिच्यावर फिदा झाले आहेत.