ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:54 IST2025-11-21T16:34:54+5:302025-11-21T16:54:11+5:30
एक पक्षी न थांबता साधारण किती उडू शकतो? १००, ५००, किंवा अगदी १००० किमी. पण एका गरुडाने त्याच्या उडण्याच्या कौशल्याने सर्वांना धक्का दिलाय. फक्त १५० ग्रॅम वजनाच्या या गरुडाने ६,००० किमी पेक्षा जास्त अंतर फक्त सहा दिवसांत पार केले आहे.

ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
एक पक्षी किती प्रवास करु शकतो? १००, ५०० किंवा १००० किलोमीटर? पण एका गरुडाने नवीन विक्रम केला आहे. त्या गरुडाची क्षमता पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. अवघे १५० ग्रॅम वजन असलेल्या या गरुडाने तब्बल ६००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर न थांबता, न विश्रांती घेता पार केले.
मणिपूरच्या जंगलातून या गरुडाने प्रवासाला सुरुवात केली. हा गरुड एका आठवड्यापेक्षा कमी वेळात थेट केनियात पोहोचला. या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत आणखी दोन गरूड होते. त्या गरूडांनी अनुक्रमे ५६०० आणि ५१०० किमीचे अंतर गाठले.
गरूड हा जगातील सर्वात लहान गरुड प्रजाती मानली जाते. सर्व पक्ष्यांवर उपग्रह-टॅगद्वारे सतत लक्ष ठेवले जात आहे. या स्थलांतराच्या नोंदी पाहून संशोधक आणि शास्त्रज्ञही थक्क झाले आहेत.
या तीन गरुडांची नावे अपापांग, अलंग आणि आहू अशी असून, तिघांनीही प्रवासादरम्यान प्रचंड ताकद दाखवली. यापैकी नारंगी रंगाचा मार्कर असलेला अपापांग सर्वांत वेगवान ठरला. अपापांगने अवघ्या सहा दिवस आणि आठ तासांत ६१०० किमीचा प्रवास पूर्ण केला.
तो ईशान्य भारतातून उड्डाण करून द्वीपकल्पीय भारत, अरबी समुद्र आणि आफ्रिकेतील घनदाट जंगल ओलांडत थेट केनियाला पोहोचला. एका छोट्या आकाराच्या पक्ष्याने एकाच उड्डाणात इतके लांब अंतर पार केल्याची ही पहिलीच नोंद असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
आणखी एका गरूडाचा पराक्रम
दुसऱ्या गरुडाचे, तिघांपैकी सर्वात लहान असलेल्या अलंगचे, पिवळ्या रंगाचे चिन्ह होते. अलंगने ५,६०० किलोमीटरचा प्रवास सहा दिवस आणि १४ तासांत पूर्ण केला. या प्रवासादरम्यान, त्याने तेलंगणामध्ये रात्रीची विश्रांती घेतली आणि महाराष्ट्रात आणखी तीन तासांचा ब्रेक घेतला. त्यानंतर, तो थेट केनियाला गेला. तरूण गरूडाने पहिल्यांदाच एवढे अंतर कापले आहे.
तिसऱ्या गरुडाचे नाव, आहू, लाल रंगाचे आहे. त्याने थोडेसे उत्तरेकडे उड्डाण केले, पश्चिम बांगलादेशात थोडा वेळ थांबले आणि नंतर अरबी समुद्रावरून आपला प्रवास पुन्हा सुरू केला. पाच दिवस आणि १४ तासांत ५,१०० किमी प्रवास केल्यानंतर, आहू उत्तर सोमालियात उतरला.