सुनेचा मुलाबरोबर रोमँटिक फोटो काढण्यासाठी सासू-सासऱ्यांनी केली मदत, Video नी जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:58 IST2023-03-23T15:56:54+5:302023-03-23T15:58:00+5:30

सासूबाईंनी सुनेचा दुपट्टा धरला अन् सासरेबुवांनी तर...

mother in law couple help son and daughter in law for clicking romantic picture on beach watch video viral | सुनेचा मुलाबरोबर रोमँटिक फोटो काढण्यासाठी सासू-सासऱ्यांनी केली मदत, Video नी जिंकली मनं

सुनेचा मुलाबरोबर रोमँटिक फोटो काढण्यासाठी सासू-सासऱ्यांनी केली मदत, Video नी जिंकली मनं

Viral Video: तुमचा मूड खराब असताना तुम्ही काय करता? बहुतेक लोक आपला मूड ठीक करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओ प्रत्येकाचा मूड सहज ठीक करू शकतात. आज आम्ही तुमच्यासाठी असा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांना खूप आनंद होईल. पूर्वीच्या काळी लग्नाआधी नवरा-नवरी वडिलधाऱ्यांसमोर येणं टाळत असत, पण आज जवळपास सगळंच नॉर्मल झालंय. आता काळ बदलला आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सासू आणि सासरे आपल्या मुलाचा आणि सुनेचा चांगला फोटो काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.

पाहा नक्की काय घडलं...

हा व्हिडीओ समुद्राकिनाऱ्यावरील आहे, जिथे एका कुटुंबातील सदस्यांची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की समुद्रकिनाऱ्यावर एक कुटुंब आहे. तिथे एक माणूस आणि त्याची पत्नी एका खडकाळ जागेवर उभे आहेत आणि फोटो काढण्यासाठी तयारी करत आहेत. परंतु कदाचित त्यांना दुसऱ्या पोझमध्ये फोटो हवा असल्याने त्या वेळी सासू-सासरे, त्यांचा सुनेला आणि मुलेला फोटो काढण्यासाठी मदत करतात. एकीकडे सासू सुनेची ओढणी लांब धरून उभी राहिलेली दिसते, तर सासरे फोटो काढण्यात मग्न दिसतात. हा व्हिडिओ अभिनेता भूषण प्रधानने यानेही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून, 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. 'या सासू-सासऱ्यांना त्यांच्या सुनेला समुद्रकिनाऱ्यावर छान फोटो काढण्यात मदत करताना पाहून भारावून गेलो,' असे या व्हिडीओचे कॅप्शन देण्यात आले आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

Web Title: mother in law couple help son and daughter in law for clicking romantic picture on beach watch video viral