मगरींच्या घोळक्यात सापडलं माकडं, मगरी फडशा पाडणारच इतक्यात...पाहुन होईल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 18:45 IST2021-11-29T18:44:00+5:302021-11-29T18:45:44+5:30
माकडं म्हटलं तर इकडून तिकडं उड्या मारणार. असंच एक माकडं मगरींच्या घोळक्यात सापडलं. त्यानंतर त्याची जी अवस्था झाली ती व्हिडिओतच पाहा...

मगरींच्या घोळक्यात सापडलं माकडं, मगरी फडशा पाडणारच इतक्यात...पाहुन होईल थरकाप
मगर हा प्राणी म्हणजे अत्यंत हिंस्त्र. त्याच्या कचाट्यात कुणी सापडलं तर त्याची खैर नाही. माणसं तर मगरींपासून दोन हात लांब राहणंच पसंत करतात. माणसांची ही कथा तर जंगली प्राण्यांच काय? त्यात माकडं म्हटलं तर इकडून तिकडं उड्या मारणार. असंच एक माकडं मगरींच्या घोळक्यात सापडलं. त्यानंतर त्याची जी अवस्था झाली ती व्हिडिओतच पाहा...
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, की कसं ते माकडं मगरींच्या विळख्यात सापडलंय. मगरी त्या माकडाला कच्च गिळणारं इतक्यात त्याच्या आईनं त्याला वाचवलं. गयावया करत उड्या मारणाऱ्या माकडाला तिनं हात देऊन वाचवलं. ही नक्कीच त्याची माय असेल यात शंका नाही.
इन्स्टाग्रामवर yourenaturegram नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक व्हिव्ज मिळाले आहेत, तर १ लाखांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे.