Viral Video: माकड श्वानाला वारंवार त्रास देत होते, मग असे पस्तावले की पुन्हा कोणाचीच कळ काढणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:06 IST2022-05-30T15:02:54+5:302022-05-30T15:06:22+5:30
माकड श्वानाची कळ काढणे सोडत नाही आणि श्वान माकडाला हुसकवून लावल्याशिवाय काही ऐकत नाही.

Viral Video: माकड श्वानाला वारंवार त्रास देत होते, मग असे पस्तावले की पुन्हा कोणाचीच कळ काढणार नाही
माणसाची जशी प्राण्यांशी मैत्री तशी प्राण्यांचीही प्राण्यांसोबत मैत्री असते. काहीवेळा या मैत्रीचे रुपांतर दुश्मनीतही होते. माकड आणि श्वानाच्या दुश्मनीबद्दल तुम्हाला माहितीच असेल. हे दोघेही एकमेकांना उभे करु शकत नाहीत. माकड श्वानाची कळ काढणे सोडत नाही आणि श्वान माकडाला हुसकवून लावल्याशिवाय काही ऐकत नाही.
सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असेच काहीसे आहे. श्वान शांत असतो पण माकडाला ते पाहवत नाही. तो श्वानाची कळ काढायला सुरुवात करतो. श्वान तरीही शांत राहतो. माकड ऐकायलाच तयार नसते. ते श्वानाला त्रास देत राहते. मग श्वानाची सटकते. तो माकडाला असा काही धडा शिकवतो की तुमची हसुन पुरेवाट लागेल. arvind_kumarr या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अनेकजण यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.