...अन् कोंबडीच्या पिलाला वाचवण्यासाठी तो चिमुकला हॉस्पिटलमध्ये पोहोचला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:30 IST2019-04-03T17:15:05+5:302019-04-03T17:30:25+5:30
लहान मुले ही देवा घरची फुले असतात याचा प्रत्यय अनेकदा येतच असतो. लहान मुलंच ही या ग्रहावर सर्वात स्वच्छ मनाची असतात.

...अन् कोंबडीच्या पिलाला वाचवण्यासाठी तो चिमुकला हॉस्पिटलमध्ये पोहोचला!
लहान मुले ही देवा घरची फुले कशी असतात याचा प्रत्यय अनेकदा येतच असतो. लहान मुलंच ही या ग्रहावर सर्वात निरागस, पवित्र आणि स्वच्छ मनाची असतात. त्यांच्या विचारांमध्ये कोणताही गढूळपणा नसतो, ते फारच सोपा आणि सरळ विचार करतात. असंच काहीसं मिझोरामच्या या चिमुकल्याबाबत म्हणता येईल.
झालं असं की, खेळत असताना चुकून या मुलाची सायकल शेजाऱ्याच्या कोंबडीच्या पिल्लावरून गेली. पण तो तिथून पळून गेला नाही. त्याने त्याच्याकडे असलेले जेवढे पैसे होते ते सोबत घेतले, कोंबडीचं पिल्लू सोबत घेतलं आणि तो जवळच्या हॉस्पिटलमध्ये मदतीसाठी पोहोचला.
एका यूजरने हा फोटो फेसबुकवर शेअर करताच मोठ्या संख्येने शेअर करण्यात आला. ५० हजारांपैक्षा जास्त लोकांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुलाच्या चेहऱ्यावर चिंतेचे हावभाव तुम्ही स्पष्टपणे बघू शकता आणि सोबतच त्याचे हे हावभाव पाहून आपलं हृदयालाही पाझर फुटू शकतो.
हे कोंबडीचं पिल्लू जिवंत आहे की मेले याबद्दल पोस्टमध्ये काहीही माहिती देण्यात आलेली नाही. पण या मुलाच्या निरागतेचं कौतुक मात्र सोशल मीडियातून भरभरून होत आहे.